जळगाव ः कोरोनाच्या (Corona) महामारी नंतर दीड वर्षानंतर महाराष्ट्र (Maharastra) राज्यातील धार्मिक स्थळे आज घटस्थापनेपासून राज्य सरकराच्या आदेशाने खुली करण्यात आली आहे. त्यामुळे नवारात्रोत्सवाला भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून भारतातील अनेक प्रसिद्ध देवी मंदिरांध्ये (Devi Temple) भाविक या नवारात्रोत्सवात (Navaratra Festival) जात असतात. जर तुम्ही नवरात्री दरम्यान देवीच्या दर्शनासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता. पण जाण्यापूर्वी एकदा मंदिरातील कोरोनाबाबत नियमांची व ई पास दर्शन पास सेवांची माहिती आधी घ्या, चला जाणून घेवू या मंदिराबद्दल..

महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)

महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)

महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे प्रसिध्द मंदिर असून येथे नवरात्रीमध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून दर्शनासाठी भाविक येत असतात. नवरात्रीमध्ये मंदिराचे व परिसराचे सौंदर्य अधिकच खुललेले असते. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर हे मुख्य शक्तीपीठांपैकी एक आहे, जिथे माता सतीचा डावा हात पडला होता. येथे भक्त आपल्या इच्छा आईसमोर ठेवतात. येथे महालक्ष्मीची प्रतिमा काळ्या पाषाणात कोरलेली आहे. कोल्हापूरला येण्यासाठी रेल्वे आणि बस दोन्ही सुविधा आहे आणि कोल्हापूरला पोहोचल्यानंतर तुम्हाला टॅक्सी आणि बस द्वारे मंदिरापर्यंत जावू शकतात.

अंबाजी माता मंदिर (गुजरात)

अंबाजी माता मंदिर (गुजरात)

अंबाजी माता मंदिर (गुजरात)

गुजरातमध्ये प्रसिध्द असलेले अंबाजी माता मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक आहे. मा अंबा भवानीच्या शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यात भवानीची मूर्ती नाही, परंतु येथे एक श्री यंत्र स्थापित आहे. ज्याला अतिशय वैशिष्यपुर्ण पद्धतीने सजवण्यात आले आहे. त्यामुळे येथे अंबामाता स्वतः बसलेली आपणास दिसते. नवरात्रीला भेट देण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. अंबाजी माता मंदिर हे गुजरात आणि राजस्थानच्या सिमेवर वसलेले आहे. त्यामुळे दोघी राज्यातून तुम्ही मंदिराय येवू शकतात. अंबाजी माता मंदिर माउंट अबूपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे, तुम्हाला बस आणि ट्रेन दोन्ही सेवा मिळू शकतात. गुजरात येथून तुम्हाला इथे जाण्यासाठी बस आणि टॅक्सी दोन्ही सेवा मिळतील. जर तुम्ही माउंट अबू वरून जात असाल तर बस सेवा घेणे योग्य राहील.

मंगला गौरी मंदिर (बिहार)

मंगला गौरी मंदिर (बिहार)

मंगला गौरी मंदिर (बिहार)

बिहारमधील ५१ शक्तीपीठांपैकी एक माॅ मंगला गौरी हे मंदिर प्रसिद्ध आहे. देवी सतीला समर्पित या मंदिरात मा मंगलाची अद्भुत मूर्ती आहे. हे मंदिर भस्मकुटा पर्वतावर असून आई मंगलागौरी मंदिराच्या गर्भगृहात आई सतीच्या स्तनाचा तुकडा येथे आहे. नवरात्री महिन्यात येथे भाविकांची गर्दी असते. येथे येण्यासाठी गया येथून रेल्वे मिळेल. तर गयाला जाण्यासाठी ट्रेन आणि विमान सेवा उपलब्ध आहेत. माॅ मंगला गौरी मंदिर विमानतळापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर असून रेल्वेने 17 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल.

महाकाली देवी मंदिर (उज्जैन)

महाकाली देवी मंदिर (उज्जैन)

महाकाली देवी मंदिर (उज्जैन)

मध्यप्रदेशातील महा काली देवी मंदिर हे प्रसिध्द मंदिर असून हे उज्जैन येथील एका टेकडीवर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी सतीचा वरचा ओठ हरसिद्धी मंदिरावर पडला. कालिया, महालक्ष्मी आणि सरस्वती या ग्रहांची तसेच अनेक देवींच्या रूपांची येथे पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये येथे भक्तांची मोठी गर्दी असते. येथे येण्यासाठी आधी तुम्हाला उज्जैनला यावे लागेल. उज्जैनला जाण्यासाठी विमान किंवा रेल्वे सेवा आहे. महाकाली देवी मंदिरात जाण्यासाठी सहज लोकल सेवा मिळेल. टॅक्सी, ऑटो या 24 तास सेवा राहते.

सुंदरी मंदिर (उदयपूर)

सुंदरी मंदिर (उदयपूर)

सुंदरी मंदिर (उदयपूर)

जुने उदयपूरमधील त्रिपुरा सुंदरी मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, सतीचा उजवा पाय भगवान शिवाच्या विनाशाच्या नृत्यादरम्यान पडला. अगरतळा पासून 60 किमी वर असून हे मंदिर महाराजा धन्या माणिक्याने 1501 मध्ये बांधले होते. उदयपूरला पोहचण्यासाठी बस, रेल्वे किंवा विमानाने पोहोचू शकता. उदयपुरला आल्यावर तुम्हाला कॅब किंवा बस सेवा मिळेल, ज्याद्वारे तुम्ही मंदिरापर्यंत जावू शकतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here