शारीरिक संबंध ही एक अत्यंत खासगी, नाजूक, संवेदनशील बाब आहे. त्यापलीकडे भावभावना, सुखदु:ख, कौटुंबिक नातेसंबंध, जबाबदारी हे एक खूप मोठं जीवन आहेच. वैवाहिक जीवनाचं आव्हान एकत्रित पेलायचं असेल तर पती-पत्नींमध्ये भावनिक नातं निर्माण होणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवन (Sex importance in married life) सुखी होण्यासाठी फक्त शरीर संबंध गरजेचे आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. शरीर संबंध ठेवले किंवा नाही ठेवले तर आपल्या वैवाहिक जीवनावर त्याचा काही परिणाम होतो का? वैवाहिक जीवनाचं यश-अपयश फक्त याच गोष्टीवर अवलंबून असतं का? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडतात.
हेही वाचा: किस करताय? ‘शास्त्र असतं ते!’
शारीरिक संबंधांविषयी प्रत्येकाचं एक वेगळं मत असतं. महत्वाचं म्हणजे जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी शारीरिक संबंध गरजेचे असतात. दोन्ही व्यक्तींमध्ये विश्वासाचं नातं असेल तर ते नात्यामध्ये अधिक पुढे जाण्याचा विचार करतात. वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधांचं नेमकं काय महत्व आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत.
जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी –
आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी शारीरिक संबंध सर्वात प्रभावशाली असतात, असे मानले जाते. ज्या नात्यामध्ये सेक्सचे प्रमाण खूपच कमी असते, असं नातं जास्त काळ टीकू शकत नाही, असेही अभ्यासातून समोर आले आहे.

शारीरिक संबंधाचे महत्व
तणाव दूर करण्यासाठी महत्वाचे –
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तणाव दूर होत असल्याचे संशोधनामधून समोर आले आहे. त्यामुळे तणावात असताना सेक्स करण्याचा सल्ला अनेकजण देतात. तसेच जोडप्यामध्ये भांडण झाले असेल तरी शारीरिक संबंधानंतर हा वाद दूर होण्यास मदत होते.
असुरक्षित भावना –
जोडप्याची सेक्स लाईफ चांगली असेल तर त्यांच्यातील विश्वास देखील वाढत जातो. एकमेकांविषयी असुरक्षित वाटत असेल तर शारीरिक संबंधानंतर ही भावना कमी होण्यास मदत होते.

शारीरिक संबंधाचे महत्व
आरोग्यासाठी फायदेशीर –
निरोगी जीवनासाठी सेक्स अत्यंत लाभदायक आहे, असे अनेकदा सिद्ध झाले आहे. सेक्स केल्यानंतर शरीरात काही हार्मोन्स सिक्रेट होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सेक्स करताना एका मिनिटात जवळपास पाच कॅलरीज खर्च होतात. त्यामुळे सेक्स करणे हे व्यायाम केल्यासारखंच असतं.
Esakal