शिवाजीनगर – घटस्थापनेच्या मुहूर्तावर शासनाच्या नियमांचे पालन करून मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सेनापती बापट रस्त्यावर असलेले चतुःश्रृंगी मंदिरात दर्शनासाठी पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी कमी दिसून आली. दर्शनासाठी तीन रांगा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक रांगेमध्ये सहा फूट अंतरावर चौकोन आखून भाविकांना कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सुचना करण्यात आल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर, शरीराचे तापमान, तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मंदिर पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

गुरुवारी घटस्थापनेचा पहिला दिवस असल्याने भाविकांची उपस्थिती कमी दिसून आली. शासनाच्या नियमांचे पालन करून मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कोरोनाचे नियम, सुचना पाळल्या जातात अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.
Esakal