पुणे : पेट्रोल, डिझेल, गॅस आदी पारंपारिक ऊर्जास्त्रोतांचे साठे आज ना उद्या संपणार आहे. तसेच त्यांच्या वापरातून होणाऱ्या प्रदूषणामुळे संपूर्ण जीवसृष्टीचेच अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. म्हणून जगभरातील शास्त्रज्ञ शाश्वत उर्जास्त्रोतांवर संशोधन करत असून, त्यापैकी वापरास सुलभ असलेला ऊर्जास्रोत म्हणजे हायड्रोजन इंधन! भारतीय शास्त्रज्ञांनी हायड्रोजन मिळविण्यासाठी एक उत्प्रेरक विकसित केले असून, ज्यामुळे सूर्यप्रकाशात हायड्रोजन आणि अमोनिया सहज मिळवता येतो.
हेही वाचा: विमानतळ बंदचा पुण्याला फटका, आर्थिक चक्रावर परिणाम
संशोधन नक्की काय :
भारतीय शास्त्रज्ञांनी ‘कॅल्शियम टायटेनेट’ या मुलद्रव्याच्या रचनेत कृत्रिम पद्धतीने बदल केला आहे. यासाठी त्यांनी पिंपळाच्या पानातील रचनेचा आधार घेतला. ‘डिफेक्ट इंजिनिअरिंग नावाचे तंत्र वापरून तयार केलेले हे मूलद्रव्य अधिक प्रकाश शोषण्यास सक्षम झाले आणि या पासून विकसित केलेला उत्प्रेरक पाण्यातून हायड्रोजन सहज विलग करतो. तसेच हवेतील नायट्रोजनच्या सहकार्याने अमोनियाही तयार करतो.
उत्प्रेरकाची वैशिष्ट्ये :
-
– मुबलक प्रमाणात उपलब्ध मुलद्रव्यांपासून निर्मिती
-
– उत्प्रेरकात ऑक्सिजनचा अणू बाहेर काढल्यामुळे चार्जचे पुनर्मिलन थांबले
-
– प्रकाश शोषण क्षमता
-
– सामान्य तापमानाला हवेत उत्प्रेरक कार्यक्षम राहतो.

हेही वाचा: Pune : शुल्काच्या वादात विद्यार्थ्यांची कोंडी; पालक हतबल
यांनी केले संशोधन :
भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडीचे (आयआयटी मंडी) प्राध्यापक डॉ. वेंकट कृष्णन यांच्या नेतृत्वात भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली (आयआयटी दिल्ली) आणि योगी वेमना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. संशोधनात डॉ. आशीष कुमार, डॉ. शाश्वत भट्टाचार्य, मनीष कुमार, डॉ. नवकोटेश्वर राव, आणि प्रा. एम.व्ही. शंकर यांचा सहभाग आहे.

संशोधनाचे फायदे :
– स्वच्छ स्वरूपातील हायड्रोजन इंधन म्हणून उपयोगात येतो
– एक उत्तम खत म्हणून अमोनियाचा वापर होतो
– पर्यावरणपुरक प्रणालीमुळे प्रदूषणाला आळा बसेल
संशोधनाच्या मर्यादा ः
– औद्योगिक निर्मितीसाठी अधिक संशोधन आवश्यक
– उत्पादनांचा प्रत्यक्ष वापरासाठी अजून वेळ
Esakal