जर तुम्ही कोरोना काळात मागील दिड वर्षांपासून घरी बसून कंटाळला असाल तर आता फेस्टिवल सिझनमध्ये तुम्ही देशभर भटकंतीसाठी(tour and travel) बाहेर पडू शकता. तुम्हाला जर देशभर फिरायचे असेल तर तुमच्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC) काही चांगले पॅकेज घेऊन आले आहे. IRCTCचे हे पॅकेज खूप परवडणारे आहे कारण ट्रेन, प्लेन प्रवासासोबत लोकल ट्रान्सफोर्टेशन (एसी वाहने), हॉटेलमध्ये राहण्याची सोय, ब्रेकफास्ट, गाईड, टॅव्हल इन्श्युरन्स या सुविधा देखील मिळणार आहे. यापैकी कोणतेही पॅकेज तुम्हाला www.irctctourism.com या वेबसाईटवरुन बुक करु शकता. पॅकेजमध्ये काय सुविधा मिळतील का नाही हे देखील तिथे सांगितले आहे. याची अंतिम माहिती तुम्हाला वेबसाईटवरच मिळेल.

केरळसाठी उत्तम पॅकेज : जर तुम्ही स्वत: खर्च करून कोच्चीपर्यंत पोहचला तर त्यानंतर केरळ फिरण्यासाठी IRCTCने चांगले पॅकेज दिले आहे. या पॅकेजची सुरुवात ६२९० रुपयांपासून सुरू होते. त्यामध्ये तुम्ही २/३ दिवसांच्या पॅकेजमध्ये कोच्ची, मुन्नार, आणि थेकडी ही ठिकाणं फिरू शकता. जर तुमच्यासोबत लहान मुलं असेल तर त्याचे १०४० रुपये अतिरक्त शुल्क द्यावे लागेल.
गोव्यासाठी देखील चांगले पॅकेज : गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी IRCTCचे ५ रात्र/६ दिवसांचा पॅकेज उपलब्ध आहे. या प्रवासाची सुरवात भोपाळपासून होते. प्रत्येकी फक्त १५३०० रुपये खर्च आहे, ज्यामध्ये ट्रेन, रोड ट्रान्सपोर्ट, हॉटेल, जेवण इं. खर्चाचाही समावेश आहे.
छपरा ते उत्तर भारतसाठी खास पॅकेज : IRCTC ने बिहारमधील छपरामधून या प्रवासाची सुरवात होईल, त्यानंतर हरिद्वार, ऋषीकेश, माता वैष्णोदेवीपर्यंत फिरण्याची संधी या खास पॅकेजमधून मिळणार आहे. हे पॅकेज एकून ५ रात्र/७ दिवसांचे असून यात हॉटेलमध्ये राहायची सोय, जेवण, गाईड अशा सर्व सुविधा मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त ६६१५ रुपये प्रवास खर्च येणार आहे. ही ट्रीप १६ नोव्हेंबरपासून सुरु होईल.
राजस्थान भ्रमंती करा : राजस्थानसाठी IRCTCने एक भन्नाट पॅकेज दिले आहे. यामध्ये प्रत्येकी फक्त १२८९० रुपयांमध्ये जयपूर ते अजमेर, पुष्कर-जोधपूर, जैसलमेर, बिकानेर पर्यंत प्रवास करू शकता. ही यात्रा ९ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून जयपूरपासून प्रवासाची सुरवात होईल. म्हणजे जयपूर पर्यंत तुम्हाला स्व खर्चाने पोहचावे लागेल. हे पॅकेज ५ रात्र/६ दिवसांचे आहे.

हिमाचलच्या पर्वतरांगासाठी खास पॅकेज : जर तुम्ही हिमाचलमधील तीर्थस्थळांना भेट द्यायची आहे तर तुम्ही चंदीगडपासून सुरवात होणाऱ्या ट्रीपमध्ये सहभागी होऊ शकता. चंदीगडपासून नैना देवी, शीतला माता, ज्वालामुखी, कांगडां, चामुंडा देवी, चिंतपूर्ण पॅकेजचा लाभ घेऊ शकता. या पॅकेजसाठी १४५८५ रुपये प्रति व्यक्ती खर्च आहे. ज्या लोकांना तीर्थस्थळसोडून फिरायचे आहे ते पर्यटनाचा वेगळा आंनद घेऊ शकता. त्यांच्यासाठी चंदीगडपासून शिमला, मनाली, पॅकेज घेऊ शकता. या पॅकेजचा खर्च २४११५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ७ रात्री/ ८ दिवसांचे पॅकेज आहे. त्यामध्ये ट्रेन, कॅब, हॉटेलमध्ये राहाण्याची सोय, जेवण, इन्शोरन्स इ. सुविधा दिल्या गेल्या आहेत.

दक्षिणमधील निर्सगसौंदर्याचा घ्या आंनद : IRCTCने कन्याकुमारी, मदुरै, रामेश्वरम, तिरुपति, त्रिवेंद्रम, आणि मग वाराणसी या ठिकाणांसाठी खास पॅकेज सुरु केले आहे. हे पॅकेज १३ रात्र/ 14 दिवसांचे आहे. या ट्रिपची सुरवात बिहारमधील राजगीरमधून होत असून एकूण खर्च १३२३० रुपये इतके आहे. जयपूरपासून सुरू होणारे वेगळे पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्हाला दक्षिण भारताच्या प्रमुख शहरांना भेट देता येईल. या पॅकेजमध्ये तुम्ही जयपूरपासून कन्याकुमारी, कोच्ची, कुमारकोमस, मदुरै, मुन्नार, रामेश्वरम, त्रिवेंद्रमपर्यंत फिरता येईल. यामध्ये ट्रेन, एअर तिकिट, रोड ट्रान्सपोर्ट, हॉटेल, जेवण सर्वकाही समाविष्ट असून प्रतिव्यक्ती ३३७२५ रुपये खर्च होईल.
साई दर्शनसाठी पॅकेज : शिरडीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी IRCTCने नवी दिल्लीमधून निघणारी ट्रेनचे खास पॅकेज दिले आहे. यामध्ये प्रतिव्यक्ती फक्त ९७२५ रुपये खर्च येऊ शकतो. हे पॅकेज ४ रात्री / 5 दिवसांचे आहे. त्यासाठी आठवड्यातून २ दिवस ट्रेन बुधवार आणि शुक्रवारी दिल्लीमधून सुटते. या पॅकेजमध्ये बस, ट्रेन, हॉटेल जेवण, इत्यादी सोयी असतात.
तिरुपति बालाजी दर्शन : दिल्लीतील तिरूपति देवस्थानम ( Tirupati Balaji Temple)प्रवासासाठीचे पॅकेज १३५६० रुपयांचे आहे. एअर तिकीट, ट्रेन, रोड ट्रान्सपोर्ट, हॉटेल, जेवण, दर्शन तिकिट, सर्व खर्च समावेश आहे . पुढील ट्रीप २३ ऑक्टोबरला सुरु होणार आहे.
४ ज्योतिर्लिंग आणि स्ट्रच्यू ऑफ युनिटी : IRCTCने एक उत्तम पॅकेज दिले आहे. गोरखपुरपासून गुजरात आणि मध्यप्रदेशमधील १ ज्योतिर्लिंग आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार पटेल यांची सर्वात उंच मुर्ती) या ठिकाणांना भेट देता येईल. यामध्ये गोरखपूरपासून ट्रेन अहमदाबाद, द्वारका, नागेश्वर, ओंकारेश्वर, सोमनाथ, उज्जैन आणि वडोदरापर्यंत फिरता येईल. पुढील ट्रीप १६ ऑक्टोबरला जाणार आहे. या पॅकेजचा खर्च फक्त ८०५० रुपये आहे. तुम्हाला जर फक्त सरदार पटेल यांची जगातील सर्वात उंच मुर्ती पाहायची असेल तर त्यासाठी अहमदाबादमधून केवडियापर्यंतचे पॅकेज १७९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रोड ट्रान्सपोर्ट, कॅब, इन्श्युरन्सचा खर्च या सर्व सुविधा दिल्या आहे.
बौध्द सर्किटसाठी पॅकेज : बिहारमधील बौध्द सर्किटसाठी IRCTCने खास पॅकेज दिले असून ७७७० रुपये इतका खर्च आहे. २ दिवस/३ रात्रींच्या या पॅकजमध्ये तुम्हाला पटनामध्ये जाऊन बोधगया, गया, नालंदा, राजगीर या ठिकाणी भेट देता येईल. पण तुम्हाला त्यासाठी स्वत:ला पटनापर्यंत पोहचावे लागेल. या पॅकेजमध्ये ट्रेनसोबत रोड ट्रान्सपोर्ट, हॉटेल, जेवण सर्व सुविधा उपलब्ध आहे.

पुर्वोत्तरमधील सुंदर ठिकाणांना द्या भेट : तुम्ही जर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी पोहचू शकत असाल तर तिथे हिमालय गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्वोत्तरमधील काही ठिकाणी भेट देण्यासाठी IRCTC ने उत्तम पॅकेज दिलेआहे. या पॅकेजमध्ये जलपाईगुडीपासून दार्जिलिंग, गंगटोक, कालिम्पोंग या ठिकाणी भेट देता येईल. त्यासाठी एकूण खर्च प्रतिव्यक्ती १९२३० रुपये खर्च असून यामध्ये रोड ट्रान्सपोर्ट, हॉटेलमध्ये राहण्याची सोय इ. खर्च उपलब्ध आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here