Deepak Chahar proposed Girlfriend: चेन्नईच्या संघाविरूद्ध पंजाबने अवघ्या १३ षटकात सामना निकालात काढला. चेन्नईने २० षटकात ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. CSKने सामना जरी गमावला असला तरी चेन्नईच्या दीपक चहरने मात्र मैदानाबाहेर एक वेगळा सामना जिंकला. चहरने आपल्या गर्लफ्रेंडला मॅच संपल्यानंतर स्टेडियममध्ये सर्वांसमक्ष रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं. अन् तिने देखील लगेचच होकार दिला. पण दीपक चहरची गर्लफ्रेंड नक्की आहे तरी कोण… जाणून घ्या

दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे जया भारद्वाज. गेल्या काही काळापासून ते दोघे डेट करत होते. मात्र आज अधिकृतरित्या त्यांनी आपल्या रिलेशनशीपला आकार दिला.

जया-भारद्वाज

जया-भारद्वाज

जया दिल्लीच्या एका कार्पोरेट कंपनीत नोकरी करते. मात्र, ती सोशल मिडियावर फारशी अँक्टिव्ह नसते. MTV Splitsvilla च्या दुसऱ्या सीझनचा विजेता आणि ‘बिग बॉस 5’ फेम सिद्धार्थ भारद्वाज याची ती छोटी बहिण आहे. सिद्धार्थ मॉडेल आणि व्हिडीओ जॉकीदेखील आहे. त्याची जया लहाण बहिण आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here