आज भारतीय वायूसेना दिनाबद्दल तीन महिला फायटर पायलटबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय महिलांनी प्रथमच वायुसेनेत वैमानिक लढाऊ विमाने चालविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या तीन लढाऊ महिला वैमानिकांनी हा मान १८ जून २०१६ रोजी पटकाविला होता.
अवनी चतुर्वेदी ही पहिला महिला फायटर असून ती राजस्थानमधील शहडोल येथील रहिवासी आहे. अवनीने राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठातून बीटेक पूर्ण केले. अवनीचा भाऊ हा इंडियन आर्मीमध्ये आहे. त्यामुळे तिला देखील वायूसेनेमध्ये सामिल होण्याची इच्छा होती. तिने मिळालेली नोकरी सोडून एअरफोर्स अॅकाडमीमध्ये प्रवेश घेतला.
अवनी चतुर्वेदी ही फायटर जेट उडविणारी पहिली महिला बनली आहे. तिने गुजरातच्या जामनगर येथूल मिग-२१ ने उड्डाण भरली. तिने एकटीने ही उड्डाण भरली होती.
भावना कांत ही देखील पहिला महिला फायटर आहे. भावनाचा जन्म १९९२ मध्ये बिहार येथील दरभंगामध्ये झाला होती. तिला बालपणापासूनच पेंटीग, खो-खो आणि बॅटमिंटनची आवड होती. फायटर पायलट बनण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे नोकरी सोडून तिने देखील एअरफोर्स अॅकाडमीमध्ये प्रवेश घेतला. १६ मार्च २०१८ ला तिने मिग-२१ बाइसन एकटीने उडविले होते.
२०१९ मध्ये अनेक लढाऊ कारवायांसाठी भावना यांची निवड झाली होती. सध्या त्या राजस्थान एअरबेस येथे तैनात असून यंदा २६ जानेवारीला देखील पहिली महिला फायटर म्हणून गणराज्य दिवसाला परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.
भावना कांत आणि अवनी चतुर्वेदीसोबतच मोहना सिंह यांची देखील महिला फायटर पायलट म्हणून निवड झाली होती. या तिन्ही महिला पहिल्या बॅचच्या महिला फायटर पायलट आहेत.
हॉक एडवांस जेट मिशन पूर्ण करणाऱ्या मोहना सिंह या पहिल्या महिला फायटर पायलट आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here