आपल्या तऱ्हेवाईक स्वभावामुळे ते चाहत्यांमध्ये प्रसिध्द होते. त्याहीपेक्षा आपल्या सहकाऱ्यांमध्ये त्यांच्याबाबत फारसं चांगलं मत नसायचं. कुणीही त्यांच्याबद्दल फार आपुलकीनं बोलतं आहे असं क्वचितच दिसायचं. आज त्या अभिनेत्याची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. त्या अभिनेत्याचं नाव राजकुमार असं आहे. ज्या अभिनेत्यानं 40 हून अधिक वर्ष बॉलीवूडमध्ये आपला काळ व्यतीत केला. त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. असा हा अभिनेता होता तरी कसा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तिरकस स्वभाव हे राजकुमार यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात ओळखले गेले.

राजकुमार यांना दिल एक मंदिर या चित्रपटासाठी बेस्ट सर्पोटिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता. त्यात त्यांनी एका कॅन्सर झालेल्या रुग्णाची भूमिका केली होती.
30 वर्षानंतर राजकुमार आणि दिलीप कुमार यांनी एकत्रित स्क्रिन शेयर केली होती. त्या चित्रपटाचे नाव सौदागर असे होते. त्या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळेस ते एकमेकांशी बोलत देखील नव्हते.
राजकुमार यांचे वयाच्या 69 व्या वर्षी कर्करोगानं निधन झाले. 3 जुलै 1996 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण पाकिझामध्ये ते दिग्दर्शकाची पसंती नव्हते. त्या चित्रपटासाठी राजेंद्र कुमार, सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता.
1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया नावाच्या चित्रपटामध्ये देखील राजकुमार दिसले होते. हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात आला होता. राजकुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये 70 हिंदी चित्रपट केले. 40 वर्षांहून अधिक काळ त्यांचा बॉलीवूडमध्ये होता वावर.
राजकुमार हे त्यांच्या तिरसट स्वभावामुळे प्रसिद्ध होते. ते फारसे कुणाशी बोलत नसतं. त्यांनी प्रकाश मेहरा यांचा जंजीर नाकारला होता. त्याचं कारण दिग्दर्शकाचा चेहरा त्यांना आवडला नव्हता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here