बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एकाची पत्नी असणे सोपे नाही आणि स्टारची पत्नी या टॅगशिवाय स्वतःची ओळख निर्माण करणे आणखी कठीण आहे. पण गौरी खानने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौरी खानला बी-टाऊनची ‘पॉवर लेडी’ म्हणूनही ओळखलं जातं.

गौरी चिब्बरचा (आता खान) जन्म दिल्लीमध्ये झाला. तिचे बालपण दिल्लीमध्येच गेले.
गौरीने तिचे शिक्षण लॉरेटो कॉन्व्हेंट शाळेत पूर्ण केले आणि नंतर तिने दिल्लीतच फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला.
१९८४ साली शाहरुख आणि गौरी प्रेमात पडले आणि १९९१ मध्ये कौटुंबिक विरोधाला न जुमानता त्या दोघांनी लग्न केले.
गौरीने नव्वदच्या दशकात एम टी.व्ही. इंडिया या वाहिनीवर (MTV India) ‘ओये’ या हिंदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
तिने छंद म्हणून तिच्या वांद्रे येथील मन्नत या बंगल्याचं इंटेरियर डिझाईन करण्याचं ठरवलं. नंतर २०१० मध्ये सुझान खानसोबत तिने व्यावसायिक भागीदारी केली.
गौरीची स्वतःची फर्निचर लाइन ही ‘द चारकोल प्रोजेक्ट’ या नावाने आहे. सोबतच तिचे ‘डिझाईन सेल’ नावाने इंटेरियर डिझाईन स्टोअर आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंटमध्ये तिने चित्रपटांची निर्माती केली आणि तिचा ‘मैं हूं ना’ हा पहिला निर्मित चित्रपट होता. ‘मैं हूं ना’ सोबत ‘ओम शांती ओम ‘,’ माय नेम इज खान ‘,’ रा.वन ‘,’ चेन्नई एक्सप्रेस ‘,’ हॅपी न्यू इयर ,’ दिलवाले ‘आणि’ रईस ‘ या चित्रपटांची निर्मिती गौरी खानने केली आहे.
गौरीचे ‘गौरी खान डिझाईन्स’ या नावाचे एक आलिशान फ्लॅगशिप स्टोअर आहे, तिने अर्थ (Arth) हे रेस्टॉरंट देखील डिझाइन केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here