लॉन्ग डिस्टन्स (Long Distance) रिलेशनशिपमध्ये (Relationship) कपल्सच्या मनात नेहमी प्रश्न असतात. कित्येक वेळा आपल्या पार्टनरला(Partner) देखील खूप मिस(Missing) करतात. अशा वेळी नातं (Relation) टिकवणे खूप अवघड असते. तुम्ही देखील लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात आणि आपल्या पार्टनरला मिस करताय? मग तुम्हाला या सर्व गोष्टी समजु शकता.


तुमचा पार्टनर किंवा तुमच्याकडे नेहमी वेळ असेलच असे नाही. त्यामुळे पार्टनरला वाट पाहायला लावण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या भेटण्याच्या वेळेचे शेड्युल ठरवून पार्टनरसोबत शेअर करा. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत बोलण्यासाठी थोडा वेळ बाजुला काढता येईल.

हे खरे आहे की, दूर राहण्यामुळे प्रेम वाढते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकमेकांना भेटू नये. थोडा वेळ काढा आणि आपल्या पार्टनरला भेटा. त्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये प्रेम राहील.

तुम्ही वेगवेगळया शहरांमध्ये राहात असला तरी तुमच्याकडे फोन आहेत. त्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवताना काहीतरी वेगळं करण्याचे ट्राय करा. उदा. व्हर्चुअल मुव्ही नाईट

या कपल क्वालिटीमध्ये जास्त क्वांटिटीला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे एकमेकांना हजारो कॉल आणि मेसेज करतात. जर तुम्ही आपल्या पार्टनरसोबत असे काही करत असाल तर अजिबात करू नका. पूर्ण दिवसामध्ये वांरवांर बोलण्यापेक्षा एकदाच निवांत बोलणे जास्त चांगले आहे
Esakal