पुणे शहर हे येथील वातावरण, टेकड्या, आयटी पार्ट आणि नामांकित शिक्षण संस्थासाठी प्रसिध्द आहे. पण त्याच बरोबर पुण्याची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे येथील खाद्यपदार्थ,(Food) म्हणूनच की काय पुणेकरांना खवय्ये म्हणून ओळखले जाते. पुण्यात असे काही प्रसिध्द फुड आउटलेट आहेत जे त्यांच्या खाद्यपदार्थांची वर्षानुवर्षे तीच चव जपत आहे. तुम्ही पुण्यात नवीन असाल, तुम्हीही खवय्ये असेल तर तुम्ही हे खास खाद्यपदार्थ नक्की खाऊन बघा! आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा 10 खास ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

तुम्हाला मिसळ खायला आवडतं असेल तर पुण्यामध्ये काटाकिर्र मिसळची मिसळ नक्की आवडेल. तुम्हाला आवडीनुसार कमी तिखट, तिखट, झणझणीत मिसळ येथे मिळेल. काटाकिर्र मिसळच्या पुण्यात बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत तरी येथे मिसळ खाण्यासाठी नेहमी ग्राहकांची मोठी रांग लागते.



बाकरवडी हा पुण्यातील प्रसिध्द खाद्यपदार्थांपैकी एक. तुम्ही पहिल्यांदा भाकरवडी खाणार असाल तर तुम्ही चिचितळे बंधू मिठाईवाले येथे जाऊन ट्राय करा. चटपटीत, खुसखुशीत बाकरवडी तुम्हाला नक्की आवडेल. चितळे बंधू मिठाईवाले यांची मँगो बर्फी देखील तुम्ही ट्राय करू शकता. पुण्यात आल्यानतंर कोणीही चितळेंची बाकरवडी सोबत घेऊन गेल्याशिवाय राहूच शकत नाही.


तुम्ही व्हेजिटेरिअन आणि पक्के खव्वये असाल तर तुम्ही हाऊस ऑफ पराठाची बाहूबली थाळी ट्राय केलीच पाहिजे. बाहुबली थलामध्ये मोठा पराठा, 8-9 व्हेजीटेबल करी, लस्सी, ताक, सलाड, दम बिर्याणी आणि आणखी बरेच काही असते. तुम्ही जर बाहूबली थाळी ट्राय करणार असाल तर तुमच्या खवय्या मित्रांना घेऊन जायला विसरू नका कारण ही थाळी तुम्हाला एकट्याने संपणार नाही.


चिंचेची चटणी, बटाटा, कांदा, चाट मसाला टाकून तयार केले चटपटीत भेळपूरी खायची इच्छा असेल तर तुम्ही कल्याण भेळला नक्की भेट द्या. पुण्यातील भेळसाठी प्रसिध्द ठिकाणापैकी एक ठिकाण म्हणजे कल्याण भेळ. तुम्ही कल्याण भेळ येथे मटकी भेळ, सुकी भेळ, ओळी भेळ, अशा वेगवेगळ्या भेळ ट्राय करता येईल.

सिंहगडावरील पिठलं भाकरी :
बेसनाचे पिठलं आणि ज्वारी किंवा भाकरी हा महाराष्ट्रातील पारंपारीक खाद्यपदार्थांपैकी एक ज्याला झुणका भाकर म्हणूनही ओळखले जाते. पुण्यात सिंहगडाला तुम्ही भेट दिली तर तेथील पिठलं भाकरी, कांदा(खेकडा)भजी, आणि मटका दही ट्राय करायला विसरू नका.

बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी नरम असे तुपात तळलेले वडे गरमा गरम वडे आणइ काकडी चटणी…..व्वा! जंगलीमहाराज रस्त्यावर हिंदवी स्वराज्य येथे मिळाणारे तुपातील साबुदाणा वडे तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे. उपवास असो नसो पुणेकर आवर्जून येथे साबुदाणा वडे खाण्यासाठी येतात.
Esakal