जळगावः भारताला (India) विस्तृत समुद्री किनारा (Beach) लाभलेला असून अविश्वसनीय सुंदर किनारे देखील आहेत. जे आपलेल्या परदेशातील सुंदर समुद्री किनाऱ्यांची अनुभूती देतात. चला तर जाणून घेवू भारतातील खास समुद्रकिनारे ज्याचे सौदर्यं आहे अदभूत..

मरीना बीच

मरीना बीच

मरीना बीच

चेन्नईचे सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणजे मरीना बीच आहे. जे स्थानिक तसेच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करते. मरीना बीचचा 13 किमीचा लांबीचा असून देशातील सर्वात लांब नैसर्गिक शहरी समुद्रकिनारा आहे. तर जगातील दुसरा सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे.

कळंगुट बीच

कळंगुट बीच

कळंगुट बीच, (गोवा)

गोव्यातील कळंगुट बीच हे सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असून या बिचला समुद्रकिनाऱ्याची राणी अशी देखील एक ओळख आहे. येथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, वॉटर सर्फिंग, केळी राईड आणि जेट स्कीइंग सारख्या खेळाचा आनंद घेता येतो. गोव्याला जाणारे बहुतेक पर्यटक या बीचला आवर्जून भेट देतात.

पुरी बीच

पुरी बीच

पुरी बीच (ओरिसा)

ओरिसा नैसर्गिक संपन्न असून येथील पुरी बीच प्रसिध्द आहे. येथे सूर्य मंदिरापासून 35 किमी आणि भुवनेश्वरपासून 65 किमी अंतरावर स्थित, पुरीचा समुद्रकिनारा सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे पाहण्याचा अनोखा नजारा येथे संधी मिळते.

वर्कला बीच

वर्कला बीच

वरकला बीच (केरळ)

केरळची राजधानी त्रिवेंद्रमच्या उत्तरेला वरला समुद्रकिनारा असून हे बीच योग आणि आयुर्वेदासाठी प्रसिध्द आहे. येथे आराम आणि ताजेतवाने होण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. एका बाजूला सुंदर उंच ताड वृक्ष आणि दुसरीकडे अरबी समुद्राचे दृश्य मन आपणास दिसते.

गोकर्ण बीच

गोकर्ण बीच

गोकर्ण (कर्नाटक)

गोकर्ण हे उत्तर कर्नाटकातील एक छोटे शहर असून भारतातील चार सर्वात निर्जन किनारे येथे आहेत. येथे मोठ्या संख्येने यात्रेकरू आणि प्रवासी भेट देत असतात. पूर्वीचे गोव्याचे बिच प्रमाणे येथील बिच दिसतात.

पालोलेम बीच

पालोलेम बीच

पालोलेम (दक्षिण गोवा)

दक्षिण गोवामध्ये पालोलेम हा सर्वात सुंदर समुद्रकिनारा मानला जातो. हा एक मैल लांब, अर्धवर्तुळाकार समुद्रकिनारा आहे ज्याभोवती नारळाच्या झाडांचे घनदाट जंगल आहे. दरवर्षी या किनाऱ्यावर भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात.

पुदुचेरी बीच

पुदुचेरी बीच

पुदुचेरी बीच

पूर्व भारतातील तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पुडुचेरी हे उत्तम ठिकाण आहे. ऐतिहासिक फ्रेंच क्वार्टर हे शहरातील हॉटस्पॉट आहे, तर जवळील ऑरोविले आणि पॅराडाइज बीच पोहण्यासाठी उत्तम ठिकाण आहेत.

तारकर्ली बीच

तारकर्ली बीच

तारकर्ली बीच (महाराष्ट्र)

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर तारकर्ली हे बीच मालवणच्या दक्षिणेस 8 किमी आणि मुंबईपासून सुमारे 546 किमी अंतरावर आहे. हे सुंदर बीच असून येथे भरपूर रिसॉर्ट आहे. येथून शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रसिद्ध नौदल किल्ला सिंधुदुर्ग तुम्ही पाहू शकतात.

राधानगर बीच

राधानगर बीच

राधानगर बीच

आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक हा समुद्रकिनारा असल्याचे बोलले जाते. हा समुद्र किनारा हॅवलॉक बेटावर स्थित असून जो बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. राधानगर बीच शांत वातावरण, शांत पाणी आणि बारीक पांढरी वाळू यासाठी प्रसिद्ध आहे.

चांदीपूर बीच

चांदीपूर बीच

चांदीपूर बीच (ओडिशा)

ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वरच्या उत्तरेस साडेचार तासावर चंडीपुर बीच बालासोर जिल्ह्यात आहे. हे अदृश्य होणाऱ्या समुद्रासाठी ओळखले जाते. एवढेच नाही तर ते सर्वात असामान्य बीच म्हणून देखील सूचीबद्ध आहे. यासह, आपण ओडिशाची अधिक चांगली आकर्षणे शोधू शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here