मुंबई : मुंबई विमानतळावर शुक्रवारी टर्मिनस 2 वर सकाळपासूनच विमान प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. विमानतळ प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे प्रवाशांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागले असून, दरम्यान कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोणतेही सामाजिक अंतर प्रवाशांमध्ये दिसून आले नाही.प्रवाशांच्या रांगेमुळे अनेकांना आपले विमान पकडता आले नाही. तर संतप्त प्रवाशांसह संगीतकार आणि गायक विशाल ददलानी यांनी सुद्धा विमानतळ प्रशासनावर संताप व्यक्त करत ट्विट केले आहे..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर सध्या फक्त आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी टर्मिनस दोन सुरू आहे. त्यावरूनच काहीप्रमाणात देशांतर्गत उड्डाण सुद्धा केले जात आहे.
कोविड निर्बंध शिथिल होताच विमान प्रवाशांमध्ये दैनंदिन प्रचंड होतांना दिसून येत असल्याने 20 ऑक्टोबर पर्यंत टर्मिनस 1 सुद्धा सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मुंबई विमानतळ प्रशासनाने दिले होते. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी विमानतळावर प्रवाशांमध्ये गोंधळ उडून,विमानतळावर पाय ठेवण्यासाठी जागा नसल्याची चित्र दिसून आले.

सणासुदीच्या काळामुळे विमान सेवेतील प्रवाशांमध्ये अचानक वाढ झाली आहे. देशातील इतर विमानतळावरही असेच अनुभव आले आहे.
महत्वाचं म्हणजे गुप्तचर विभागाकडून देशातील इतर विमानतळाला धमकी आली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील प्रवाशांची तपासणी अधिक काटेकोर करण्यात येत आहे.
प्रवाशांच्या सुविधांसाठी अतिरिक्त प्रवासी तैनात करण्यात आले असून, शासनाच्या कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला असून, 20 ऑक्टोबर पासून अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसाठी टर्मिनस 1 सुरू करणार असल्याचेही विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर सध्या फक्त आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी टर्मिनस दोन सुरू आहे. त्यावरूनच काहीप्रमाणात देशांतर्गत उड्डाण सुद्धा केले जात आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here