दाक्षिणात्य (south actress) लोकप्रिय जोडी समंथा (actress samantha) रुथ प्रभुचा पती नागा चैतन्यशी (naga chaitanya) नुकताच घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी घटस्फोटांची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. त्यांच्या निर्णयामुळे त्यांचे चाहते अत्यंत नाराज झाले आहेत. घटस्फोटाची बातमी सांगितल्यानंतर समांथाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. पण आता समांथाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. समांथाने इन्स्टाग्राम स्टोरीत एक कोट (Quote) शेअर केला. त्यामधे, “शुभ सकाळ, जेव्हा महिलांशी संबंधित एखादा मुद्दा असतो, तेव्हा त्यावर नैतिकदृष्ट्या प्रश्न उपस्थित केले जातात, पण तेच जर एखाद्या पुरुषाने केलं तर त्यावर काहीच प्रश्न विचारले जात नाहीत. एक समाज म्हणून आपल्याकडे ती नैतिकता नाहिए,” असे कोट(Quote) समांथाने शेअर केले आहे.
गेल्या महिन्यात समंथा आणि नागा चैतन्य यांनी विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. जेव्हा नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाची घोषणा समांथाने केली होती तेव्हा तिनं लिहिलं होतं की, आमच्या नात्याचा विचार करणाऱ्या सर्व माझ्या हितचिंतकांना सांगू इच्छिते, आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांपासून असणारी माझी मैत्री आणि प्रेम यापासून आता आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.त्या दोघांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांचे चाहते नाराज झाले होते. समंथा आणि नागा चैतन्य हे २०१० मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. त्या दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. समांथा आणि नागा चैतन्य यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

दरम्यान, समंथाने फॅमिली मॅन २ या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर नागा चैतन्य आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच नागा चैतन्य चा साई पल्लवी सोबत लव स्टोरी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा: केवळ समंथा-नाग चैतन्यच नाही; नागार्जुन यांच्या कुटुंबातील घटस्फोटांचा इतिहास
हेही वाचा: लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा-नाग चैतन्यने जाहीर केला घटस्फोट
Esakal