आपल्या हटकेपणासाठी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी नेहमीच चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. ती नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिडिओ ती चाहत्यांना शेयर करते. त्यातून ती त्यांचं लक्ष वेधून घेत असते. बॉलीवुडची (bollywood) धकधक गर्ल माधुरी दीक्षित (madhuri dixit) नेने साोशल मिडियावर सक्रिय असते. सध्या माधुरी आणि डॉ नेने त्यांचे थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत. गेल्या आठवड्यात, या जोडप्याने त्यांच्या मुलांची बालपणीचा फोटो शेअर केला होता आणि आता, डॉ नेने यांनी माधुरीसोबतचा स्कुबा डायविंगच्या सूट मधला एक जुना फोटो शेअर केला. हा फोटो अमेरिकेत काढला असून, हा फोटो त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे.
फोटोमध्ये, माधुरी आणि श्रीराम यांनी कॅमेरासाठी पोज देताना वेटसूट घातले होते. फोटो शेअर करत श्रीराम म्हणाले, “उन्हाळ्यात ‘फ्लोरिडा’च्या ‘हॉट पार्किंग’मध्ये स्कूबा डायव्हिंग शिकण्यास काहीच हरकत नाही. खरोखर, ‘फ्लोरिडा एक्विफर’ खूप स्वच्छ आहे आणि त्याचे तापमान नेहमीच ७० अंश असतं.आणि काही मिनिटांतच माधुरी न घाबरता ‘जॅक कॉस्टो’ मध्ये १०० फूट खाली गेली होती.” याआधीही डॉ नेने यांनी अरिन आणि रयान यांच्या बालपणीचे फोटो पोस्ट केले होते.माधुरी आणि श्रीराम यांनी १९९९ मध्ये लग्न केले. त्यानंतर माधुरीने अभिनयातून ब्रेक घेतला आणि अमेरिकेत स्थायिक झाली. २०१५ मध्ये ‘टॉक्स अॅट गुगल’ या सेशनमध्ये माधुरीने तिचा भारत ते अमेरिका या बदललेल्या आयुष्याबद्दल सांगितले. इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या माहितीनुसार, माधुरी म्हणाली, “भारतात तुम्ही तुमच्या मोलकरणींवर अवलंबून राहू शकता,आपण त्यांच्यावर सर्वकाही सोडू शकतो, परंतु यूएसएमध्ये आपल्याला स्वयंपाक स्वताः करावा लागतो, स्वताःच किराणा सामान खरेदी करावं लागतं, सर्वकाही स्वतः करावं लागतं. मला आठवतं ,जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत किराणा खरेदीला गेलो होते तेव्हा माझे हृदय खूप धडधडत होतं. पण नंतर, मला छान वाटलं.”

माधुरी आणि श्रीराम यांनी १९९९ मध्ये लग्न केले. त्यानंतर माधुरीने अभिनयातून ब्रेक घेतला आणि अमेरिकेत स्थायिक झाली. २०१५ मध्ये ‘टॉक्स अॅट गुगल’ या सेशनमध्ये माधुरीने भारत ते अमेरिका या बदललेल्या आयुष्याबद्दल सांगितले. इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या माहितीनुसार, माधुरी म्हणाली, “भारतात तुम्ही तुमच्या मोलकरणींवर अवलंबून राहू शकता,आपण त्यांच्यावर सर्वकाही सोडू शकतो, परंतु यूएसएमध्ये आपल्याला स्वयंपाक स्वत; करावा लागतो, स्वताःच किराणा सामान खरेदी करावं लागतं, सर्वकाही स्वतः करावं लागतं. मला आठवतं ,जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत किराणा खरेदीला गेलो होतो तेव्हा मला खूप भीती वाटली. पण नंतर, मला छान वाटलं.” २००७ मध्ये माधुरीने ‘आजा नचले’ या चित्रपटातून कमबॅक केले. नंतर तिने ‘गुलाबी गँग’,’ कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ हे चित्रपटात केले. सध्या ती डान्स दिवाने ३ या शो मध्ये जज् आहे.
Esakal