मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुखच्या मुलामागील संकट काही केल्या कमी व्हायला तयार नाही. आर्यन खाननं बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावर आर्यनच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एनसीबीनं देखील न्यायालयापुढे मोठ्या प्रभावीपणे आपले मुद्दे मांडल्याचे दिसून आले आहे. आता त्यांना आणखी चौदा दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आर्यनला आपल्याला जामीन मिळेल अशी आशा होती. मात्र कोर्टानं आज पुन्हा त्याचा जामीन फेटाळला आहे.

ASG सिंग यांनी सांगितलं की, जी कलमं संशयित आरोपींना लावण्यात आली आहेत त्यानुसार एनडीपीएस कोर्टामध्ये हजर केले जाऊ शकतं. त्यामुळे जामीनाची जी मागणी करण्यात आली आहे ती फेटाळण्यात येते. मी पुन्हा एकदा सांगतो की, या कोर्टामध्ये रेग्युलर बेल आणि इंर्टिम बेल देता येत नाही.

आरोपींकडून व्हाटस् अप चॅट क्रुझवर मिळणं हा काही योगायोग नाही. त्यांच्या जबाबावरुन असं दिसून येतं की, ते क्रुझवर जाण्याअगोदर भेटले होते. आणि सर्व आरोपींनी यापूर्वी देखील ड्रग्जचे सेवन केले आहे. त्यामुळे हा कोणत्याही प्रकारचा योगायोग नाही.

एनसीबीच्या वतीनं असंही सांगण्यात आलं की, आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यावरुन असे दिसुन येते की, जे काही झाले तो योगायोग नव्हता. आरोपी हे एक आणि दोन टर्मिनलवर भेटले होते.

एएसजी अनिल सिंग यांनी कोर्टाला सांगितलं ही याचिका या कोर्टामध्ये चालण्यासारखी आहे का, त्याचा विचार करायला हवा. जामीनावर सुनावणी त्यावर होईल. त्यासाठी दुसऱ्या कोर्टात जावे लागणार आहे.

एएसजी म्हणाले भलेही तुमच्याजवळ छोटया प्रमाणात ड्रग्ज असेल पण आपण त्या समुहाचा भाग होतात. आणि त्या सगळयांचे जवाब आमच्याजवळ आहेत. त्या व्हाट्स अॅप चॅटमध्ये फुटबॉल संदेशाची गोष्ट करण्यात आली होती. त्यात आणखी काही संदर्भ आले होते.
Esakal