IPL 2021 MI vs SRH: कोलकाता संघाने गुरूवारच्या सामन्यात राजस्थानला ८६ धावांनी पराभूत करून साऱ्यांनाच चकित केले. त्यामुळे आज सुरूअसलेल्या सामन्यात मुंबईला हैदराबादवर १७१ धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने रोहित शर्माने टॉस जिंकत पहिली बाजी जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार, मुंबईच्या इशान किशनने तुफानी सुरूवात केली.

हेही वाचा: Viral Video: इशान किशनची सुरू होती हिरोपंती अन् तितक्यात…

रोहित-इशान जोडीसमोर हैदराबादने फिरकीपटू मोहम्मद नबीला संधी दिली. त्याला पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत इशानने डावाची सुरूवात केली. त्यानंतर पुढच्याच षटकात त्याने सिद्धार्थ कौलला सलग चार चौकार लगावले. आणि त्यानंतरच्या षटकात जेसन होल्डरलला २ चौकार आणि १ षटकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इशान किशनने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने इशान किशनने अवघ्या १६ चेंडूतच अर्धशतक ठोकले. यंदाच्या हंगामातील हे सर्वात जलद ठोकलेलं अर्धशतक ठरलं.

इशान किशनने धडाकेबाज कामगिरी करत अर्धशतक ठोकले. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासातदेखील सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत इशान किशनने पाचवा क्रमांक पटकावला. त्याने सुरेश रैनाच्या कामगिरीशी बरोबरी केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here