अबू धाबीच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला आहे. मोठ्या फरकाने सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशनच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबईने चांगली सुरुवात केली. एका बाजूला इशान किशन आणि मुंबईच्या रणनितीची चर्चा सुरु असताना ट्विटरवर #MIvsSRH या सामन्याच्या हॅशटॅगसोबतच #Ambani आणि #fixing हे दोन हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ हा अंबानींच्या मालकीचा आहे. त्यामुळेच मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यावेळी लोक अंबानी या हॅशटॅगच्या माध्यमातून मजेशीर मिम्स आणि प्रतिक्रिया शेअर करत आहेत. काहीजण हा सामना सेट आहे, अशा प्रतिक्रिया देत आहेत. यासाठी #fixing या हॅशटॅगच्या माध्यमातून प्रतिक्रिया उमटताना दिसते.

मुंबई आणि हैदराबाद दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळत आहेत. सनरायझर्स हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफ गाठण्याची आस आहे. जर त्यांनी हैदराबादला मोठ्या फरकाने पराभूत केले तर त्यांच्यासाठी एक संधी निर्माण होऊ शकते. त्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.

Esakal