नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय. स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.

देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद लुटताना दिसतात.
सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीने मात्र पुढाकार घेत हा नवरात्रीचा सण साजरा करण्याचं ठरवलं आहे. कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे.
नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी बोलतात.
महिलांच्या सुफलीकरणाचा सण म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.
अरुंधती आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाचा हा भोंडला आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना पहायला मिळेल. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here