बॉलिवूडमधील स्टायलिश आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. आपल्या हटके अंदाजासाठी शिल्पा ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. साडीला मॉडर्न टचसोबत कॅरी करणे आणि पारंपारिक ड्रेसिंगसोबत एक्सपेरिमेंट करण्यामध्ये शिल्पा शेट्टी चर्चेत आली आहे. यावेळी शिल्पाने तिच्या आउटफिटबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे शिल्पाचा नवा लूक यावेळीही हटके दिसून येत आहे. शिल्पाने पुन्हा एकदा साडी नेसली आहे. तिचे चाहते तिच्या नवीन आउटफिटची आतुरतेने वाट पाहत आहेत की, शिल्पा या वेळी तिच्या ड्रेसिंगमध्ये काय ट्विस्ट आणणार आहे. शिल्पा तिच्या चाहत्यांना निराश करत नाही आणि प्रत्येक वेळी तिच्या ड्रेसिंगमध्ये नवीन ट्विस्ट सोबत दिसून येते.

शिल्पाच्या नवीन लूकबद्दल बोलले तर, यावेळी शिल्पाने व्हाइट साडी घातली आहे, पण शिल्पाच्या व्हाइट साडीची स्टाइल वेगळी आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या नवीन लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने व्हाइट साडी घातली आहे. शिल्पा या साडीमध्ये अप्सरासारखी दिसत आहे. शिल्पाची व्हाइट साडी लॉंग स्कर्टसारखी लूक देत आहे. ज्यामध्ये लाईट प्लीट्स देण्यात आले आहेत आणि तिच्या कंबरेवर सिल्वर कंबरबेल्ट दिसत आहे. शिल्पाने साडीसोबत व्हाइट ब्लाउज घातला आहे. ज्यामध्ये तिच्या गळ्याजवळ सिल्व्हर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे, जे एका नेकपीसचा लूक देत आहे. शिल्पाने फुल स्लीव्ह ब्लाउज घातला आहे. हातांवरही एम्ब्रॉयडरी केलेलं दिसत आहे.
शिल्पाचा आणखी एक पिवळ्या साडीचा लूक चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये दिसून येईल की शिल्पाने पिवळ्या रंगाची साडी पूर्णपणे वेगळ्या स्टाइलने घातली आहे. तिने साडीला मॉडर्न आणि कम्फर्टेबल लूक देण्यासाठी खाली लेगिंग घातलीय. याशिवाय साडीमध्ये बेल्टही घातलेला दिसत आहे. या प्रकारची साडी स्टाईल पारंपारिक लूक व्यतिरिक्त महिलांना आरामदायक आणि स्टायलिश लुक देते.
तसेच या फोटोमध्ये शिल्पाने जांभळ्या (पर्पल) रंगाची टाय-डाई साडी घातली आहे. या साडीच्या पुढच्या बाजूला स्लिट आहे. शिल्पाने या साडीचे मॅचिंग ब्लाउज घातले आहे, जे डीप व्ही नेकलाइन शेपचे आणि हाप स्लीव्हस आहे. या पर्पल आणि व्हाइट साडीमध्ये शिल्पाने एथनिक ड्रेसिंगना सेक्सी ट्विस्ट दिला आहे. यात दुपट्टा स्टाइल पदर आहे. शिल्पाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी केस मोकळे ठेवले आहेत. तिने नोज रिंग, लॉंग सिल्व्हर इयरिंग्स, सिल्व्हर बॅंगल्स आणि फिंगर रिंग्स घातल्या आहेत.
यापूर्वी शिल्पाने पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर स्टाइलची साडी घातली होती. साडीला कम प्लीट्स आहेत आणि कंबर पट्टा साडीशी जोडलेला दिसून येत आहे. तसेच साडीचा पदर या कंबरेच्या खाली घेऊन एक लूक देण्यात आला आहे. शिल्पाच्या या लूकमधील खास गोष्ट म्हणजे तिचा ब्लाउज. शिल्पाच्या ब्लाउजचा स्लीव्हस बलून स्टाईलमध्ये आहे आणि ब्लाउज कफ केलेला आहे. शिल्पाचा हा लूक रॉयल आणि एथेनिक दिसत आहे.
बॉलिवूडमधील स्टायलिश आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. आपल्या हटके अंदाजासाठी बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.
साडीला मॉडर्न टचसोबत कॅरी करणे आणि पारंपारिक ड्रेसिंगसोबत एक्सपेरिमेंट करण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here