जळगावः भारतातील (India) महत्वाचे प्रदेशापैकी एक राज्य म्हणजे मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आहे. हे राज्याला प्राचीन इतिहास लाभलेला असून येथे बरेच प्राचिन वास्तू, राजवाडे, किल्ले (Fort) आहे. काही किल्ले प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत बांधले गेले, जे केवळ देशभरात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यात अतेर किल्ला (Ater Fort) हा प्रसिध्द असून वैशिष्टपूर्ण आहे, चला तर जाणून घेवू या अतेर किल्ला बद्दल..

अतेर किल्ला
अतेर किल्ल्याचा इतिहास
मध्य प्रदेशातील भिंड शहरापासून ३५ किमी अंतरावर अतेर किल्ला चंबल नदीच्या काठावर आहे. हा किल्ला भदौरिया राजा बदन सिंह याने सुमारे 1664 ते 1668 दरम्यान बांधला होता. अटेरचा किल्ला बाबत रहस्यमय कथा आहे. हिंदु आणि मुघल वास्तुकलेचा एक अनोखा नमुना मानला जातो. हा किल्ला देवगिरी दुर्ग टेकडीवर वसलेला आहे ज्याचा उल्लेख महाभारतात आहे.
गूढ दरवाजा
आतेर किल्ल्यातील सर्वात प्रसिद्ध रक्तरंजित दरवाजा असे आहे. या दरवाजाचा रंग लाल असून तसेच त्या काळातील राजाला येथे लाल टिळक लावला जात असे असे येथील रहस्यमय कथा येथे सांगितल्या जातात.

अतेर किल्ला
भेट देण्याचे इतर ठिकाणे
अतेर किल्ल्याच्या जवळपास बरेच ठिकाणे आहे जेथे दररोज हजारो लोक भेट देत असतात. येथे माता रेणुका मंदिर, वांखंडेश्वर मंदिर आणि बारांसोचे जैन मंदिर आदी भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणी आहे. याशिवाय भिंडपासून काही अंतरावर असलेल्या ऐतिहासिक मल्हार राव होळकर याची छत्री येथे फिरायला जावू शकतो.
Esakal