वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून तलावात येणाऱ्या सांडपाणी आणि कचऱ्यामुळे रहिवशांना फटका बसला आहे,

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात आज मृत माश्यांचा खच पडलेला दिसला. हजारो मासे मृत्युमुखी पडले.
माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
उन्हाची वाढलेली काहिली आणि तलावातील पाणी 10 ते 12 शिड्या अचानक खाली गेल्याने मासे मेल्याचे स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
तलावात 5 किलो पेक्षा अधिक वजनाचे मासे मोठ्या प्रमाणात आहेत. तलावातील पाणी कमी झाल्याने माश्यांना पुरेसा प्राणवायू मिळाला नाही.
मासे चिखलात दाटीवाटीने फिरू लागल्याने माश्यांचा मृत्यू झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. सध्या या तलावाच्या देखरेखीचे काम ब्राह्मण गौंड सारस्वत ट्रस्टकडून पाहिले जात आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here