तुम्ही हाताने शेवटचे पत्र केव्हा लिहले? तुम्हाला आठवतेय का? पत्र…सोशल मीडियाच्या काळात कोण पत्र लिहितं. खर आहे पण, असाही एक काळ होता जेव्हा मोबाईल इंटरनेट काहीही नव्हते, तेव्हा एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी टपाल सेवाच उपयोगी पडत असे. पत्र पोहचविणारे पोस्टमास्तर काका तुम्ही पाहिले असतील…पण एक पत्र पोहचवायला त्यांना काय काय करावे लागते यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. पोस्टमास्तरच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या, विविध पैलू मांडणाऱ्या शॉर्ट स्टोरी आपण एकदा नक्की पाहा.

रविंद्रनाथ टागोर यांची पोस्टमास्टर : नोबेल पारितोषिक विजेते आणि प्रसिद्ध भारतीय लेखक रवींद्रनाथ टागोर हे एक स्वातंत्र्यसैनिकही होते. टागोरांच्या बहुतेक शॉर्ट स्टोरी या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील बंगाली लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. ‘पोस्टमास्टर’ ही अशीच एक कथा आहे.एकटेपणा, आनंद, कृतज्ञता, नातं, आठवणी आणि अपराधीपणा अशा विविध भावनांवर दर्शविणारी सुंदर कथा आहे. एका छोट्याशा गावी कामावर आलेल्या एका तरुण पोस्टमास्तरवर एका किशोरवयीन मुलगी रतन नात्याबद्दलची ही एक भावनिक कथा आहे. कोलकत्त्यावरून छोट्या गावी आलेला पोस्टमास्टर कविता करुन आपले मन रमविण्याचा प्रयत्न करत असतो. तुटपुंजा पगार असूनही तो गावातील रतन नावाच्या अनाथ मुलगी थोडाश्या अन्नाच्या बदल्यामध्ये घरकाम करण्यास सांगतो. टागोर यांची ‘पोस्टमास्टर’ ही वर्णनात्मक कथा असून त्यांची निर्मिती खूप सुंदर आहे. रविंद्रनाथ टागोर यांच्या 3 कथेवरून प्रेरित होऊन1961 मध्ये प्रसिध्द दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘तीन काया’ नावाची फिल्म तयार केली. टागारोंच्या 3 कथांपैकी एक पोस्टमास्टची सुंदर आणि हृदयद्रावक कथा ‘रे’ यांनी पडद्यावर आणली आहे.
मुंबई फिल्म कंपनीची ‘तार’: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ‘तार’ शॉर्ट फिल्म देखील चर्चेत होती. या शार्टफिल्मचे दिग्दर्शन पंकज सोनावणे यांनी केले असून नागराज यांनी पोस्टमास्तरची भूमिका साकारली आहे. भुषण मंजुळे, भूषण हंबे, विवेक जांबळे, पूजा डोळस या नामांकित कलाकारांनीही चित्रपटात काम केलं आहे. गावोगावी फिरुन पत्र आणि तार वाटणाऱ्या पोस्टमास्तरच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. जेव्हा एखाद्याच्या मृत्यूची तार घेऊन पोस्टमास्तर जातो तेव्हा…..काय काय घडते? पोस्टमास्तरच्या मनात काय सुरू असते हे दाखविणारी ही शॉर्ट फिल्म आहे
Esakal