चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी सर्वांदेखत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरुन लक्ष्य केले. (फोटो – महाइन्फो सेंटर) नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. (फोटो – महाइन्फो सेंटर) उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या संयमी नेतृत्वामुळे देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री ठरले आहेत. कोरोना संकट कालावधीत महाविकासआघाडीच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी गेले दीड वर्ष अनेक संकटावर मात केली. या विमानतळाचे भूमीपूजन शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले होते तर उद्धाटन हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले असे सांगत यासाठी पायगुण लागतो असा टोलाही हाणला. (फोटो – महाइन्फो सेंटर) चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असा घणाघाती टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. (फोटो – महाइन्फो सेंटर) नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. (फोटो – महाइन्फो सेंटर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा दिल्या. तर नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी “नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. (फोटो – महाइन्फो सेंटर) येत्या पाच वर्षात 20 ते 25 विमानं सिंधुदुर्गमध्ये झाली पाहिजेत चिपी विमानतळ हा नवीन इतिहास आहे नवीन अध्याय आहे या विमानतळमुळे सिंधुदुर्ग जिल्हा विश्वरूप घेईल, असं यावेळी केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया म्हणाले. (फोटो – महाइन्फो सेंटर) सिंधुदुर्गाचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय, नाहीतर कोणीतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला’केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आपणच असल्याचा दावा केला होता. (फोटो – महाइन्फो सेंटर)पर्यावरण जोपासत कोकणचा विकास करूया, सिंधुदुर्ग विमानतळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी कसे येतील. यासाठी माझा प्रयत्न राहणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात रखडलेल्या दोन पंचतारांकित हॉटेलसह सी-वर्ल्ड चा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील. त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत, असं यावेळी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. (फोटो – महाइन्फो सेंटर) “एकत्र आले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे मला आठले महायुतीचे गाणे”, “सिंधुदुर्गात येणार आहे आता विकासाची आंधी, म्हणून मला मिळाली आहे इथे येण्याची संधी” अशा शीघ्र कविता करुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थितांचं चांगलचं मनोरंजन केलं. (फोटो – महाइन्फो सेंटर) साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही, असे नारायण राणेंनी म्हटले होते. (फोटो – महाइन्फो सेंटरनारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी राणेंची चांगलीच हजेरी घेतली. नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. (फोटो – महाइन्फो सेंटर)