मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदौरच्या कुटुंब न्यायालयाने नुकताच एक महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महिलेला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पतीपासून घटस्फोट घेण्याची परवानगी दिली आहे. या महिलेला पति आणि सासरच्या मंडळींकडून शिक्षणासाठी विरोध होत होता, त्यानंतर या महिलेने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता.

पीडितेच्या वकील प्रति मेहना यांनी सांगितले की, पीडित महिलेचे 13 वर्षांच्या वयात लग्न झाले होते, त्यानंतर तिला पतीकडून सतत शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. पीडितेला शिक्षण घेण्याची इच्छा होती, मात्र तिला पती आणि सासरच्यांनी शिक्षणापासून वंचित ठेवले होते. पती आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळलेल्या पीडितेने कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाच्या न्यायमुर्ती प्रवीणा व्यास यांनी या प्रकरणात पीडितेला आपल्या पतीपासून घटस्फोट घेण्यास परवानगी दिली आहे.
हेही वाचा: ‘कोरोना माता मंदिर’ पाडण्याविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली
कुटुंब न्यायालयात चालणाऱ्या वेगवेळ्या खटल्यामधील हे एकमेव प्रकरण असे आहे की, ज्यामध्ये न्यायालयाने शिक्षणापासून वंचित राहण्याच्या कारणास्तव घटस्फोटाच्या याचिकेला परवानगी दिली आहे.
Esakal