ठाणे : मुंबई-ठाणे-नाशिक (Mumbai-Thane-Nashik) महामार्गावरील कोपरी पुलाच्या अतिरिक्त मार्गिका पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आज सुरू करण्यात आल्या. पुलाच्या सदोष कामांमुळे या मार्गिकांचे परीक्षण आयआयटीकडून करण्यात येत होते. त्यामुळे मार्गिकांचे उद्घाटन लांबले होते.
एमएमआरडीएकडे आपआयटीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता या नव्या मार्गिका खुल्या केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होण्यास मदत होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गिकवरील कोपरी रेल्वे पूल हा अत्यंत अरुंद असल्याने दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत ठाण्याहून मुंबईला तसेच मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. त्यामुळे पूर्व द्रुतगती मागांवर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यासाठी जूनमध्ये येथील ठाण्याच्या दिशेने येणारी आणि मुंबईच्या दिशेने जाणारी अतिरिक्त मार्गिका उभारलेली आहे. खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर. स्थायी समिती सभापती संजय भोईर आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई
हेही वाचा: पुणे महापालिकेचा कारभार! कोट्यावधी रूपये खर्चून उभारलेली प्रयोगशाळा वापराविना पडून
आठपैकी दोन-दोन अशा चार मार्गिका सुरू केल्या आहेत. नाशिक, मुंबई, जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी याचा फायदा होणार आहे. उर्वरित मधल्या चार मार्गिकांचे काम रेल्वे आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू होणार आहे. ते काम वर्षभराच्या आत पूर्ण केले जाणार आहे.
Esakal