कास (सातारा): महाराष्ट्राचे अ‍ॅमेझॉन खोरे म्हणून निसर्गाची मुक्तहस्ते उधळण केलेल्या कोयनेच्या खोऱ्यावर धुक्याची चादर पसरण्यास सुरुवात झालीय.

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे.
दिवसभर ऑक्टोबरच्या हिटने अंगाची लाही-लाही होत असताना सायंकाळनंतर मुसळधार अवकाळी पाऊस पडतो.
अशा पावसानंतर वातावरणातील बाष्प वाढून सकाळी पांढरेशुभ्र धुके तयार होते. अशा धुक्याची चादर पहाटेच जमिनीवर अवतरलेली दिसतेय.
पांढरेशुभ्र धुके, वरती निळे आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे आभाळच जमिनीवर उतरल्याचा भास होतो.
हा नजारा एवढा अप्रतिम असतो, की पाहतच रहावे. याचा आनंद उंच जागेवरून घेता येतो.
कासच्या पश्चिम दिशेला असलेल्या सह्याद्रीनगर गावातून हा नजारा खूप छानपणे पाहता येतो.
उंचावरुन हा नजारा पाहायचा असेल, तर हा परिसर आदर्श ठिकाण आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here