मऊसुत, लालसर रंगाचा, चांदीचा वर्ख लावलेला, पाकात घोळलेला गुलाबजाम पाहिला की कधी तो खायला मिळतो, असे होऊन जाते. गरम किंवा गार अशा दोन्ही प्रकारात हे गुलाबजाम खाल्ले जातात लग्नकार्याच्या वेळी, कुठल्याही सण-समारंभाच्या वेळी गुलाबजाम हमखास केला जातो. अगदी कधीही खावासा वाटेल, असा हा प्रकार आहे. आईसक्रीम गुलाबजाम ते गुलाबजम केक असे गुलाबजाम खाण्याचे प्रकार बदलत आहेत.भारतात अनेक ठिकाणी लोकप्रिय असणारा हा गुलाबजाम मुळचा आपला नाही, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Rabadi Gulabjam
गुलाब जामचा इतिहास
मध्ययुगीन काळात गुलाबजमची निर्मिती भारतात झाली असावी, असे मानले जाते. इतिहासात गुलाबजाम संदर्भातील अनेक रंजक तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. गुलाबजामच्या उगमाची कथा रंजक आहे. सतराव्या शतकात मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली.त्याने दुधाच्या खव्याचे गोलाकार वळून तुपात तळले आणि साखरेच्या पाकात सोडले. त्यात गुलाब पाणी शिंपडून पाक सुगंधित केला. जांभळासारखा टपोरा आकार आणि गुलाबाचा सुगंध यावरून गुलाबजामची निर्मिती झाली असे मानले जाते.
हेही वाचा: माझी रेसिपी : मटार आंबोळी
स्पुरला बामियेवरून
पर्शियन बमिया आणि तुर्कीश तुलांबा हे दोन गोड पदार्थ देखील बहुतांश गुलाबजामशी साधर्म्य साधणारे आहेत. बामिया पदार्थ कसा झाला तर, मध्यमपुर्वेतल्या पुरातन संस्कृतीतल्या मानवाने स्वतः रांधलेले काही पदार्थ होते. त्यात पिठाचे गोळे तळून, भट्टीत भाजून, मधात घोळवलेला प्रकार असलेल्या गरम वाढला जातो. ह्या परदेशी पदार्थांची प्रेरणा घेऊनच मुघल आचाऱ्यांकडून गुलाबजामचा आविष्कार केला गेला होता. परंतु या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत.
गुलाबजाम शब्द आला कसा?
गुलाब नाही आणि जामही नाही. मग गुलाबजाम हा शब्द आला कसा ? तर, पर्शियन शब्द गोल आणि अब वरून गुलाब हा शब्द आला आहे. ज्याचा अर्थ फुले आणि पाणी असा असून त्याला गुलाबपाणी असे म्हणता येईल. तर, जामुन हा शब्द जांभळावरून आला असून तो हिंदी आणि उर्दू शब्द आहे. त्याचा आकारही तसाच छोटा आहे.

गुलाबजाम आईस्क्रीम
गुलाब जामची प्रकार
गुलाबजाममध्ये आणखी एक प्रकार म्हणजे काला काला जामुन. काळ्या आणि जांभळ्या रंगाचा हा गुलाबजाम नेहमीपेक्षा जास्त गोड असतो आणि अधिक तापमानावर तयार केला जातो. कणकेमध्ये साखर मिसळली जाते, जी तळल्यानंतर कॅरेमल बनते आणि त्याला काळा रंग मिळतो आणि त्याला काला जामुन म्हणतात. पंटुआ हा आणखी एक बंगाली प्रकार आहे, जो पारंपारिक गुलाब जामुन सारखाच आहे. गुलाब जामुन की सब्जी हे राजस्थानमधील एक प्रकार आहे जिथे हे गोळे टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात. सध्या ब्रेडचा गुलाबजाम लोकप्रिय आहे.

गुलाबजाम केक
गुलाब जामचा केक
आजकाल गुलाबजाम वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. काहींना तर व्हॅनिला आईस्क्रीमच्या मध्ये गरम गुलाबजाम घालून खाणे आवडते. काही तर पोळीबरोबरही गुलाबजाम खाऊ शकतात. तसेच केकमध्ये गुलाबजाम फ्लेवरचे केक मिळू लागले आहेत. व्हॅनिला किंवा गुलाबजामच्या फ्लॅवरशी जवळ जाणारा केक करून त्यावर गुलाबजामचे टॉपिंग केले जाते.अशाप्रकारचा केक सध्या खूप लोकप्रिय आहे.
Esakal