डोंबिवली : ललीत पंचमी निमित्त दरवर्षी कल्याण (Kalyan) जवळील मलंगगडावर पायी दिंडी सोहळा रंगतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा वारकऱ्यांच्या उपस्थितीत मलंगगडावर पालखीचे प्रस्थान करण्यात आले. तत्पूर्वी गडाच्या पायथ्याशी टाळ मृदुगांच्या गजरात गोल रिगंन करीत जय हरी विठ्ठल ,‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोष करीत संपूर्ण परिसर निनादून सोडला.

नवरात्रीच्या पाचव्या माळेला म्हणजेच ललीत पंचमीला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख स्व. आणि ठाणे, रायगड जिल्ह्यातील वारकरी हे मलंगगडावर आरतीसाठी जात असत. ही परंपरा अखिल कोकण वारकरी संप्रदायाने आजही जपली असून पंचमीला मलंगगडावर उत्सव साजरा केला जातो. रविवारी पंचमी उत्सवानिमित्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदू मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मलंगगडाच्या पायथ्याशी श्री मलंग नाथांचा जप करत 10 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी व दिंडी गडावर प्रस्थान केले. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख पराग तेली, रामायणाचार्य विश्वनाथ महाराज वारिंगे, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री हिंदू मंचचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश देशमुख हे उपस्थित होते.

मुंबई

मुंबई

हेही वाचा: कोरोनाच्या वैश्विक साथीमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 10 वारकऱ्यांना गडावर जाण्याची व आरतीची परवानगी देण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिंडीत सहभागी इतर वारकऱ्यांनी गडाच्या पायथ्याशी भजन, कीर्तन करत गोल रिगंन करत मलंग नाथाचा जयघोष केला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here