भंडारा: जिल्ह्यातील मोहाडी गावात श्री क्षेत्र गायमुख येथे उगम पावणाऱ्या गायमुख नदीच्या तिरावर माता चौण्डेश्वरी देवीचे मंदिर आहे़. हे मोहाडीवासीयांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेले पुरातन मंदिर आहे़. येथे अश्विन शुक्ल प्रतिपदेला दरवर्षी विधीवत घटस्थापना करून धार्मिक मंगलमय वातावरणात नवरात्रोत्सव प्रारंभ होतो. नवरात्र महोत्सव अतिशय उत्साहात सुरू झाला असून माता चौण्डेश्वरी देवीचे मंदिर पुरातनकालीन ब्रिटीशांच्या राजवटीतील आहे़. मोहाडीला नवरात्र महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील विदर्भातील भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरिता घटस्तंभ ठेवतात.

अनेक वर्षापासून उपेक्षीत असलेल्या या अतिप्राचीन मंदिरच्या जिर्णोद्धार करण्यात आल्यानंतर मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येत असून मंदिर परिसराचा संपूर्ण विकास करीत आहे. येथील मंदिराच्या प्रांगणात मोकळ्या जागेत शोभीवंत फुलझाडांची लागवड करण्यात आल्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला आहे़. माता चौण्डेश्वरी देवी मंदिर कमेटीच्या कार्यामुळे प्रभावित होऊन अनेक दानशुर नागरिक मंदिराला आर्थिक मदत करीत आहेत. नवरात्र महोत्सव- भंडारा शहरापासून २१ किमी व तुमसरपासून ११ किमी अंतरावर मोहाडी हे गाव आहे़. भंडारामार्गे आले तर श्री संत जगनाडे चौकात उतरावे मोहाडी या गावाच्या पश्चिम दिशेला श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर देवी मंदिर आहे़. मोहाडी व परिसरातील जनतेचे श्रद्धास्थान असलेले माँ चौण्डेश्वरी देवीचे मंदिर अत्यंत जागृत अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्रात या परिसरातील भाविक पायपीट करीत देवीच्या दर्शनासाठी येतात. आपल्या अस्तित्वाने मोहाडी नगरीला पुनीत करणाऱ्या या आई चौनदेस देवीच्या नावावरुन मोहाडी हे नाव पडले असावे. गावाच्या पश्चिम दिशेला श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर आपल्या गोड व रंगीबेरंगी पक्षी ह्रदयस्पर्शी स्वरांनी अरण्याचा सारा आसमंत भरून टाकणारे मंदिर आम्रपाली व विविध वृक्षांनी बहरलेले रम्यस्थळ आहे़. यावर्षी (२०२१) नवरात्रामध्ये विदर्भातील व जिल्ह्यातील भाविक यावर्षी १ हजार ४६८ घटस्तंभ ठेवण्यात आले आहे़त. मोठ्या श्रद्धेने भाविक येतात व घटस्तंभाचे दर्शन घेतात. मंदिर परिसरात आजही टेकडी या देवीच्या नावाने लोकप्रिय आहे़.

हेही वाचा: पाकिस्तानला मोठ्या भूकंपाचा हादरा; 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

मोहाडी येथील जाणकार सांगतात की, आज ज्या ठिकाणी माँ चोण्डेश्वरी देवी मंदिर आहे़. त्या ठिकाणी फार मोठे घनदाट जंगल होते. हे ठिकाण वृक्षवेलींनी नटलेल्या टेकडीला वेढा घातलेले आहे. परिसरातून जाणारी गायमुख नदी यामुळे ही जागा तपोवनासारखी शांत व निसर्गरम्य होती. एकदा या निसर्गरम्यस्थळी त्यावेळी संत नारायणस्वामी यांनी मुक्काम केला. गावकाऱ्यांकडून त्यांना गावातील अडचणींच्या परिस्थितीची जाणीव झाली. त्या काळात रस्ते नसल्यामुळे मोहाडी हे गाव अतिदुर्गम होते. गावात सुखशांती नांदावी याकरिता नारायण स्वामींनी या टेकडीवर महाचण्डी यज्ञाचे आयोजन केले होते. हवन करणे, महायज्ञ करणे, कुटुंबाची प्रथा होती. त्यांनी गावाला सुखशांती प्राप्त व्हावी यासाठी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. श्री दत्तपाठ गुरूघटांची स्थापना करून त्यांनी पुजेला सुरूवात केली. महायज्ञाच्या आवर्तनासाठी तुप, दुध, बेल, फळ, फुल, धूप व पुजा साहित्य ठेवल्या गेले होते. महायज्ञाच्या आवर्तनासाठी दुरवरून आलेल्या ऋषीमुनींनी मंत्रोपचाराला सुरूवात केली. प्रारंभी महायज्ञाच्या आवर्तनासाठी ठेवलेले साहित्य संपले. त्यानंतर ऋषीमुनींनी बाजूला ठेवलेले ऋग्वेद, यजुर्वेद, अर्थवेद व सामवेदांचे एक एक पान सोडत असताना हवनकुंडात गर्जना करीत माँ चौण्डेश्वरीचे चेहरा बाहेर आला. माँ चौण्डेश्वरी म्हणाली, “आपने जो महाचन्डी महायज्ञ हवनकुंड मे सच्चे मन से मेरी साधना की और जो चार वेद छोडे उसकी शक्ती बनकर मै प्रगट हुई हूँ। आप मुंझे मॉ चौवेदेश्वरी कह सकते है। जो भी भक्त मेरी सच्चे मन से साधना करेगा मै उसकी मनोकामना पुर्ण करूंगी। मेरा आशिर्वाद आदी अनादिकाल तक रहेगा।” असे म्हणून आई अंतर्मुख झाली. माँ चौवेदेश्वरी कालांतराने माँ चौण्डेश्वरी या नावाने प्रचलित झाली.

विदर्भ

विदर्भ

हेही वाचा: ‘आपने माझ्या कामाची नेहमीच कदर केली’; सिद्धू यांच्या ट्विटमुळे नव्या चर्चांना उधाण

आजही मोहाडीची माँ चौण्डेश्वरी देवी विदर्भात व भंडारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे़. ऐतिहासिक पार्श्वभूमी अतिशय पुरातन असलेल्या या आई चौण्डेश्वरी देवी मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्थापनेपासून अनेक वर्ष मॉ चौण्डेश्वरी देवीची मूर्ती उघड्यावर एका ओट्यावरच्या हवनकुंडात स्थापवलेली होती. श्री संत नारायण स्वामी त्यावेळी देखभाल करीत होते. काही वर्षानी नारायण स्वामीचे वैकुंठगमन झाले. त्यानंतर नारायण स्वामींच्या कुटूंबातील सदस्यगण देखभाल करीत होते. काही काळातच नारायण स्वामींच्या कुटूंबातील मंडळींचे निधन झाले.

याठिकाणी सन १९८२ ला दत्त जयंतीच्या शुभपर्वावर श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंडळ मोहाडीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीत भव्य नामजप महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यातील आमला विश्वेश्वर येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या गोपालकाला या विषयावर किर्तन झाले होते. त्यावेळी गायमुख नदीच्या तिरावर शंभर पोत्याचा तांदाळाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला जिल्ह्यातील व विदर्भातील भाविकांनी लाभ घेतला होता. तेव्हापासून आई चौण्डेश्वरीचे हे मंदिर प्रसिद्धीच्या झोतात आले.

हेही वाचा: ‘कोरोना माता मंदिर’ पाडण्याविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली

चौण्डेश्वरी देवीचा चेहरा इतका मोठा आहे की, नऊवारी साडी घातल्यावरसुद्धा ती अपुरी पडते. बाकीचे पूर्ण शरीर जमिनीच्या आत आहे. मॉ चौण्डेश्वरी देवीचे डोळे, कान, नाक व मुख स्पष्ट दिसते. चौण्डेश्वरी देवी मोहाडीवासियांचे आराध्य दैवत बनले आहे.

आई चौण्डेश्वरी देवी मंदिर परिसरात असणाऱ्या विस्तीर्ण जागेचा कायापालट केला असून हे ठिकाण एक निसर्गरम्य ठिकाण झाले आहे. येथील तयार करण्यात आलेले बगीचा हे एक मंदिर परिसराचे आकर्षण ठरले आहे. संपूर्ण मंदिर परिसरात वृक्षारोपण केल्यामुळे हा परिसर अतिशय सुंदर बनला आहे. परिसरातील जनावरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गायमुख नदीच्या तिरावर मंदिर परिसरात आवार भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. वडाच्या झाडाजवळ बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्थेसाठी मोठे सभामंडप बांधण्यात आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ कूपनलिका बांधण्यात आली आहे. मंदिराच्या उजव्या बाजुला नवीन विहिरीचे बांधकाम व महिला-पुरुषांकरिता स्वच्छता गृहाचे बांधकाम सुरु आहे. त्याचप्रमाणे मंदिरात येणाऱ्या भाविकाकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी पाईपलाईन जोडण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. नागपूरचे सुप्रसिद्ध शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला विशेषज्ञ प्रा. प्रमोद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली माता चौण्डेश्वरी देवीचे आकर्षक असे डोळे तयार करण्यात आले. त्यामुळे चौण्डेश्वरी मातेच्या मुर्तीचे अधिकच आकर्षण वाढले आहे. मॉ चौण्डेश्वरी देवी मंदिर कमेटीची नुतन कार्यकारिणी तयार करण्यात आली. अध्यक्ष प्रेमरतन दम्मानी, उपाध्यक्ष एकानंद समरीत, सचिव रमेश गोन्नाडे, कार्य.सदस्य बाळु बारई, किशोर पातरे नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष विनोद पातरे यांच्या देखरेखेखाली मंदिराची कायापालट होत आहे. मंदिर कमेटी मंदिराच्या सभासद शुल्कातून व भाविकांच्या देणगीतून सन १९९८ ला पंचेचाळीस हजार चौरस फुट जागेभोवती परकोट व उंचसखल जागेचे सपाटीकरण करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदीरात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सन २०११-१२ मध्ये १ कोटी १० लक्ष १ हजार ३९४ रुपये निधी जमा करण्यात आला आहे. मागील नवरात्रोत्सवात सुरू करण्यात आलेले मुख्य गर्भागृहाचे व मुख्य मंदिराच्या विशाल सभामंडपासहित पुननिर्माणाचे बांधकाम सुरु आहे. दानशुर दात्यांना मंदिर कमेटीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की, यशाशक्ती दान देवून मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात सहयोग करावे.

जागृत मोहाडी मॉ चौण्डेश्वरी देवी मंदिरात शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, शंकर भोलेनाथ व नंदीबैल मुर्ती आहेत. श्री. संत नारायण स्वामींच्या चरण पादुका मंदिर आहेत. दरवर्षी अश्विन शुक्ल भाद्रपद नवरात्रोत्सवानिमित्त यात्रा भरत असते. एकदा जाणीवपूर्वक नजर टाकल्यास मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून दिसते. साजश्रृंगार करुन नववधुप्रमाणे हिरव्या वनराईचे दिसणारे विहंगमय दृश्य मनाला मोहून टाकते. प्रत्यक्ष आपण आल्याशिवाय उपःकालाची सृष्टिशोभा पाहण्याचा योग मात्र मोहाडीतच रात्रीच्याच्या वेळी रोशनाई तर डोळे दिपवून टाकणारी असते. यात्रेचे विशेष आकर्षण मनोरंजन लहानमुलांकरिता चक्कर झुले यात्रेत येतात. दरवर्षी नवरात्र उत्सव कमेटी भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करीत असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here