तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात रथ अलंकार महापूजा शनिवारी (ता.नऊ) बांधण्यात आली होती. तुळजाभवानी मातेच्या नवरात्राच्या निमित्ताने देवीची वेगवेगळी रूपे मांडण्यास शनिवारी प्रारंभ झालेला आहे. तुळजाभवानी मातेचे नित्य अभिषेक झाल्यानंतर सकाळीच पुजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या सिंहासनासमोर अश्व ठेवण्यात आले होते. तसेच तुळजाभवानी माता रथामध्ये बसल्याची पुजा बांधण्यात आली.
(सर्व छायाचित्रे : लक्ष्मीकांत घोडके, तुळजापूर)







Esakal