मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. याच्या आदेशानुसारच शरीरातील इतर कामे होतात. आरोग्यदायी जीवनासाठी मेंदूचे काही फंक्शन्स उत्तम असणे गरजेचे असते. यासर्व गोष्टींसाठी आपण जागरुक रहावे म्हणून दरवर्षी हा दिवस ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ साजरा केला जातो. आज आपण अशा गोष्टींची माहिती पाहणार आहोत जे मेंदूसाठी फायदेशीर असतात.

पालक –

पालकमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. हे शिकण्याची किंवी लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवते. पालकमध्ये व्हिटॅमीन बी६, ई आणि फोलेटचे प्रमाण असते.

अक्रोड –

अक्रोडमध्ये प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण अधिक असते. बुद्धीची क्षमता वाढीसाठी याची मदत होते. यामध्ये एक प्रकारचे ओमेगा-३ फैटी आम्ल असते. हे ब्लड प्रेशरला कमी करण्याचे आणि धमन्यांचे संरक्षण करते. हृदय आणि डोके दोन्ही उत्तम ठेवते.

कॉफी –

एकाग्रता वाढवण्यासाठी कॉफीची मदत होते. याशिवाय मेंदूला अॅंटीऑक्सिडंटही पोचवण्याचे काम करते. शरीराला कैफीनची आवश्यकता असते. एका ठराविक प्रमाणात याचे सेवन करणे गरजेचे असते.

दूध –

दूधामध्ये व्हिटॅमीन बी-६ आणि बी -१२, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. ही पोषकतत्वे बुद्धीवाढीसाठी मदत करतात.

ब्लॅकबेरी –

मेमरी वाढवण्यासाठी ब्लॅकबेरी खाल्ली जाते. जर तुम्हाला शॉर्ट मेमरी लॉसची समस्या असेल तर तुम्ही याचा वापर करु शकता. यामध्ये असणारे अॅंटीऑक्सीडंट हे ब्रेनसेल सुरक्षेसाठी वापरले जातात असे मानले जाते.

पाणी –

मेंदूता बराच जवळपास ८५ टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. एका संशोधनानुसार पाण्याचा कमी वापर हा मेंदूतील मस्तिष्क आणि केशिकांसोबत एकाग्रता आणि मेमरील प्रभावित करते. यामुळे दिवसभरात किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हेव.

डार्क चॉकलेट –

मेंदू शार्प ठेवण्यासाठी चॉकलेट मदत करते. डार्क चॉकलेट ब्रेन बुस्टरचे काम करते. हे डोके शांत ठेवण्याचे कामही करते. याशिवाय सफरचंद, द्राक्षे, कांदा, चहा, बिअर, वाइन यामध्येही फ्लैवोनॉयड्स असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here