बॉलीवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रेखाजी. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयीच्या काही गोष्टींचा आढावा घेणार आहोत. 70 च्या दशकामध्ये रेखाजींनी आपल्या नावाचा ठसा उमटविला होता. आजही त्या कमालीच्या लोकप्रिय आहे. त्यांचा प्रभाव आजच्या पिढीवरही असल्याचे दिसून आले आहे. रेखा यांचं फिल्मी करिअर हे यशस्वी राहिलं. मात्र त्याचवेळी त्यांना वेगवेगळ्या वादांनाही सामोरं जावं लागल्याचे दिसुन आले आहे.रेखा यांनी आपल्या वयापेक्षा कमी अशा अभिनेता अक्षय कुमारशी देखील अफेयर केलं होतं. खिलाडीयो का खिलाडीमध्ये रेखा यांनी त्याच्यासोबत बरेच इंटिमेट सीन दिले होते. त्यावरुन रेखा यांना मोठअया प्रमाणावर टीका सहन करावी लागली होती.





Esakal