सातारा : वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आज पुन्हा एकदा बाईक राईडमुळे (Bike Ride) चर्चेत आले. कार्यकर्त्याची दुचाकी ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागाची रपेट करत विकासकामांची उद्घाटने केली.

उदयनराजे हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो. युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजे यांनी उगारलेले बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कस ग सांगू.. हे म्हणलेले गाणे, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचे नेहमी सर्वांना आकर्षण असते. चारचाकी इतकेच त्यांना दुचाकी वेगात चालविण्याची प्रचंड आवड आहे. मध्यंतरीच्या काळातील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना “कार्यकर्ते हेच माझे मंत्रिमंडळ” असे व्यक्तव्य करत त्यांनी कार्यकर्ते माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले होते. आलिंगन देत उदयनराजे कार्यकर्त्याला आपलेसे करतात.

हेही वाचा: दसऱ्यानंतरच रणधुमाळी; BJP च्या उदयनराजेंचा ‘निर्णय’ NCP च्या कोर्टात

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale

गेले काही दिवस उदयनराजे हे सातारा येथील विविध विकासकामे मार्गी लावत आहेत. आज देखील त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार होते. यासाठी ते 007 या क्रमांकाच्या अलिशान चारचाकीतून जलमंदीर पॅलेस येथून बाहेर पडले. त्यांच्या पुढेमागे अनेक कार्यकर्ते दुचाकी घेऊन होते. वाटेत एक कार्यक्रम उरकल्यावर उदयनराजे यांनी चारचाकी सोडून कार्यकर्त्याच्या दुचाकीचा ताबा घेतला. कार्यकर्त्याला पाठीमागे बसवत दुचाकीचे सारथ्य स्वतः करत उदयनराजे यांनी नंतर शहरात चक्कर मारत इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. यामुळे उदयनराजे आणि त्यांची बाईक राईड पुन्हा एकदा चर्चेत आली.

हेही वाचा: ‘त्यांना घेऊन निवडणूक लढवणार असाल, तर तो शरद पवारांचा अपमान असेल’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here