डेन्मार्कच्या पंतप्रधान एम फ्रेडरिक्सन या भारत दौऱ्यावर आल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली.
डेन्मार्कच्या पंतप्रधान एम फ्रेडरिक्सन भारत दौऱ्यावर आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रेडरिक्सन यांचे स्वागत केले. शनिवारी एम फ्रेडरिक्सन या भारतात पोहोचल्या. पंतप्रधान मोदी आणि फ्रेडरिक्सन यांच्यात शनिवारी चर्चा झाली.दोन्ही देशांमध्ये सध्याच्या कोरोना संकटाच्या परिस्थितीवर चर्चा झाली.जगभरासाठी पंतप्रधान मोदी प्रेरणास्रोत असल्याचं फ्रेडरिक्सन यांनी म्हटलं.डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी भेट दिली.फ्रेडरिक्सन यांनी राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी त्यांचे पती बो टेंगबर्ग यांच्यासह ताजमहलला भेट दिली.