काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेनंतर अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आज किसान न्याय सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लखीमपूर प्रकरणावरून केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले आहे.

किसान न्याय सभेत प्रियांका गांधींचं आक्रमक रुप पाहायला मिळालं.
यावेळी त्यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि इतर नेते उपस्थित होते.
राज्य सरकार आणि केंद्रीय राज्यमंत्री त्यांच्या मुलाला संरक्षण देतायेत, त्यामुळे पीडितांच्या कुटुंबांना उत्तर प्रदेशात न्याय मिळण्याची आशा राहिलेली नाही. असं विधान त्यांनी यावेळी केलं
आज या देशात फक्त दोन प्रकारचे लोक सुरक्षित आहेत, ते म्हणजे सत्तेत असलेले भाजप नेते आणि त्यांचे अब्जाधीश मित्र अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.
प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आज किसान न्याय सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लखीमपूर प्रकरणावरून केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे पुन्हा एकदा मैदानावर उतरल्याचे पाहायला मिळते आहे.
आगामी काळातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मुद्यावरून भाजपला धारेवर धरलं आहे.
पीडित परिवार म्हणतात की आम्हाला नुकसानभरपाई नको आम्हाला न्याय हवा आहे, मात्र या सरकारमध्ये आम्हाला न्याय देणारं कोणी दिसत नाही’ असं वक्तव्य प्रियांका गांधी यांनी किसान न्याय सभेला संबोधित करताना केलं.
पंतप्रधान ‘उत्तम प्रदेश’ आणि आजादी का अमृत महोत्सवाचं काम पाहण्यासाठी लखनऊला आले, पण पीडित कुटुंबांचे सांत्वन करण्याासाठी लखीमपूर खेरीला जाऊ शकले नाहीत: प्रियांका गांधी
एकूणच लखीमपूरकडे जाताना प्रियांका गांधी यांच्यावर झालेली कारवाईनंतर त्या पुन्हा एखदा जोमानं कामाला लागल्याचं दिसतं आहे.
शेतकरी वर्षभरापासून आंदोलन करतायेत, या दरम्यान 600 हून अधिक शेतकरी मरण पावले. ते विरोध करतायेत कारण त्यांना माहिती आहे की, त्यांचे उत्पन्न, जमीन आणि पिकं या सरकारच्या अब्जाधीश मित्रांना जातील असंही प्रियांका गांधींनी यावेळी सांगितलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here