ICC T20 World Cup 2021: युएईच्या धर्तीवर सध्या IPL 2021 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीचे सामने आजपासून सुरू होणार आहेत. आणि आजपासून सात दिवसांनंतर T20 World Cup चा थरार रंगणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण कोरोनाच्या भीतीपोटी ही स्पर्धा युएई आणि ओमानला हलवण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या दरम्यान ही विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेत सुरूवातीला पात्रता फेरीत आठ संघ खेळणार आहेत आणि नंतर सुपर-१२ मध्ये १२ सर्वोत्तम संघ विश्वकरंडकासाठी खेळणार आहेत. या स्पर्धेच्या विजेत्यांसाठी किती रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल याबद्दल माहिती देण्यात आली.

टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. या संघामधून ज्या संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळेल, त्या संघाला तब्बल १.६ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १२ कोटी रूपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ६ कोटी रूपये सुपूर्द केले जातील. याशिवाय, सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी ४ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ३ कोटी रूपये देण्यात येणार आहेत. १६ संघामध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण ५.६ मिलियन डॉलर्सची म्हणजे ४२ कोटींची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

आयसीसी टी -20 विश्वचषक

आयसीसी टी -20 विश्वचषक

ICC ने दिलेल्या माहितीनुसार, ड्रिंक्स ब्रेक हा अडीच मिनिटांचा असेल. तसेच, सुपर-१२ फेरीमध्ये प्रत्येक विजेत्या संघाला बोनस बक्षीसही दिलं जाणार आहे. २०१६च्या विश्वचषक स्पर्धेत असं करण्यात आलं होतं. म्हणजेच सुपर १२ फेरीत होणाऱ्या एकूण ३० सामन्यांसाठी ४० हजार डॉलर्स इतकी रक्कम म्हणजेच सुमारे १ कोटी २० लाखांची रक्कम बक्षीस दिली जाणार आहे. तसेच, सुपर-१२ फेरीत ज्या संघांचा प्रवास संपेल त्या संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ५२ लाखांचे बक्षीस दिले जाईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here