तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेची (Tuljabhavani Mata) मुरली अलंकार महापुजा रविवारी (ता.दहा) बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात ललिता पंचमी निमित्त सकाळी आठ वाजता नित्योपचार पूजा झाल्यानंतर मुरली अलंकार महापुजा बांधण्यात आली. तुळजाभवानी माता मुरली हातामध्ये घेऊन वाजवत आहे, अशी पूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या मस्तकावर अभिषेक पुजा झाल्यानंतर चंदन चोपण्यात आले. तसेच कपाळावर गंध लावण्यात (Navratri) आले. मस्तकी टोप घालण्यात आला. तसेच गळ्यामध्ये दागदागिने घालण्यात आले. तुळजाभवानी मातेस रत्नजडीत खडावापासून वेगवेगळे दागिने घालण्यात आले. तसेच मंदिराच्या गाभाऱ्याचा परिसर (Tuljapur) फुलांनी सजविण्यात आला होता.
हेही वाचा: तरुण शेतकऱ्यावर काळाची झडप,पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

तुळजाभवानी मातेचा गरूड वाहनावर शनिवारी ता.9 काढण्यात आलेली छबिना मिरवणूक.
मोठी गर्दी
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत महाद्वारातही मोठी गर्दी झाली होती. शहरात पहाटेपासून महाद्वारासमोर भाविक दर्शन घेत होते. शहरातील चहुबाजूने अनेक ठिकाणी वाहने ही लावण्यात आली होती.
पावसामुळे फजिती
शहरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पावसाच्या सरी बरसल्या. रस्त्यावर असणारे भाविक काही दुकानांचा आधार घेत होते. ही स्थिती शहरात पाहावयास मिळाली. पाऊस आल्याने गर्दीने भरलेला भाग सुनासुना झाला.
Esakal