पुरेशी आणि भरपूर झोप मिळणे, हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे आणि महत्वाचे आहे. तुम्हाला जर सात ते आठ तास अशी चांगली झोप मिळत असेल तर तुम्ही दिवसभर अतिशय ताजेतवाने असता. पण अपुरी झोप मिळाली किंवा नोकरीमुळे, अतिरिक्त कामामुळे रोजच्या झोपण्याचे चक्र बिघडत असेल तर मात्र त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारची समस्या जर दीर्घकालीन राहिली तर मात्र तुम्हाला उच्च रक्तदाब, नैराश्य, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे पुरेशी झोप मिळणे हे खूपच गरजेचे आहे. झोप न मिळाल्याने तुमच्या आरोग्यावर असे परिणाम होऊ शकतात.
रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम
जेव्हा तुम्ही दिवसातले सात ते आठ तास झोपता तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. पण जेव्हा हे चक्र बिघडते तेव्हा तणाव वाढून तुमच्या शरीरातील अँटीबॉडीजवर परिणाम होतो. त्याचे कार्य कमी होते. त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते.

व्हॅलेंटाईन डे ऑफर जोडप्यांना गरोदर राहिल्यास मोफत राहता येते
प्रजनन क्षमता कमी होते
अनियमित झोपेमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच शारीरिक संबंधांवर परिणाम होतो. परिणामी गर्भधारणेसही अडथळा येऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप मिळणे गरजेचे आहे.

वजन वाढण्यासाठी सकाळच्या टिप्स नागपुर बातम्या
वजन वाढते
अनियमित झोपेचा वजनावरही परिणाम होतो. तुम्ही ऑफिसमधून उशिरा घरी आल्यावर जेऊन लगेच झोपता. त्यामुळे चयापचय प्रक्रियेस अडथळा येतो. परिणामी कोलेस्ट्रॉल वाढून त्याचा शरिरावर परिणाम होऊन वजनही वाढेल. त्यामुळे तुम्हाला तणाव जाणवेल.
हेही वाचा: World Mental Health Day 2021 – कुशाग्र बुद्धीसाठी हे पदार्थ खा
उच्च रक्तदाब, मधुमेहात वाढ
पुरेशी झोप न मिळाल्याने रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाचा शरीरावर वाईट परिणाम होतो. परिणामी हार्मोन्सचे चक्र बिघडते. त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. तसेच ग्लुकोज आणि इन्शुलिनच्या पातळीचे चक्र बिघडते. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

नैराश्य
नैराश्य, चिंता बळावते
पुरेशी झोप न मिळाल्याने कंटाळा, चिडचिड वाढते. तुम्ही सतत वैतागलेले असता. तुमच्या झोपेचे चक्र आणि मूड नियंत्रित करण्याचे काम मेलाटोनिन हार्मोन करत असतो. पण अनियमित झोपेचा फटका या मेलाटोनिनच्या पातळीला बसल्याने तुम्ही सतत उदास राहता, नैराश्यात वाढ होते. तसेच निद्रानाश होतो.
हेही वाचा: तुमच्या या सवयी ठरू शकतात डिप्रेशनला कारणीभूत
स्मरणशक्ती कमी होते
पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या मेंदूवर विपरित परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. त्याचा वाईट परिणाम रोजच्या जीवनावर होतो. त्यामुळे सात ते आठ तासांची झोप मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे आहे.
Esakal