संजीव वेलणकर
देशात पांढरा, लाल, पिवळा असे काद्याचे तीन प्रकारचे रंग आहेत. कांद्यात असलेल्या एन्ट्रोसायजिंग या रंगद्रव्यामुळे कांद्याचा रंग लाल होतो. पांढऱ्या कांद्यात हे रंगद्रव्य नसते. चवीला तो कमी तिखट असतो. युरोपमध्ये पिवळा व पांढरा कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो. मात्र अन्यत्र लाल कांद्याचीच चलती आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये लाल कांदा वापरला की, रंग बदलतो. पण पांढरा कांदा वापरला की, रंग तोच राहतो. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगात पांढऱ्या कांद्याला अधिक मागणी आहे. आता बाजारात रेडी टु इट प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यात पांढरा कांदाच वापरला जातो. पांढऱ्या कांद्याचे काप मोठय़ा हॉटेलमध्ये मिळतात.पांढऱ्या कांद्याचे वैशिष्टय़ म्हणजे तिखटपणा. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला अलिबागचा पांढरा कांदा export पण होतो. उन्हाळ्यात पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी असते. पांढरा कांदा हा माळे प्रमाणे विकला जातो.

अलिबागचा पांढरा कांदा.
ठाणे जिल्ह्यातील वसई आणि नाशिक जिल्ह्यात पांढ-या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा इतर ठिकाणी होणा-या कांद्यापेक्षा वेगळा आहे. इतर ठिकाणी होणारा पांढरा कांदा तिखट असतो. त्या तुलनेत अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा कमी तिखट असतो. अलिबाग तालुक्यातील काही गावांपुरते मर्यादित असणारे हे पीक आता, वाढती मागणी आणि चांगला भाव यामुळे जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांतही मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. पांढरा कांदा निर्जलीकरण, पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी वापरला जातो.
हेही वाचा: मला वेगवेगळे पदार्थ खायला आणि बनवायला आवडतात -अभिनेत्री प्रतिक्षा जाधव
हे आहेत औषधी गुणधर्म
1) सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताजा कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते.
2)रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते हे मधुमेह रोगावर परिणाम करते.
3) कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अॅरसिड असते
4) हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते.
5) रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे अॅनिमियाही दूर होतो.
Esakal