मुंबई: लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस (congress) , राष्ट्रवादी (ncp) आणि शिवसेना (shivsena) अशा महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची (maharashtra bandh) हाक दिली आहे. आज सकाळपासूनच महाराष्ट्र बंदचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. कुठे याला पाठिंबा दर्शविला जातोय तर कुठे विरोध… या पार्श्वभूमीवर जाणून घ्या राज्यात काय सुरू काय बंद आहे….

हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर…

9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले.

जाणून घ्या राज्यात काय सुरू काय बंद?

महाराष्ट्र बंदचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. कुठे याला पाठिंबा दर्शविला जातोय तर कुठे विरोध… या पार्श्वभूमीवर जाणून घ्या राज्यात काय सुरू काय बंद आहे….

‘हे’ सुरू…

मुंबई लोकल

डबेवाल्यांची सेवा

सरकारी ऑफिसेस

हॉस्पिटल, मेडिकल

भाजीपाल्याची दुकाने

तातडीची सेवा

रुग्णालये

दवाखाने

‘अरे’ बंद?

खाजगी आस्थापना

विविध बाजार समिती

बेस्ट आणि पीएमपीएमएल सेवा

खाजगी वाहतूक

बाजार समितीचा प्रतिसाद…भाजीपाला प्रभावित

नाशिक लासलगाव, धुळे, नंदुरबार, मनमाड, बारामती बाजार समितीची बाजार समिती (कांदा बाजार) बंद राहील. त्यामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहेमुंबई-ठाणे आणि परिसरातील लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे नवी मुंबईची एपीएमसी बाजारपेठ आज बंद आहे. नवी मुंबईतून मुंबई आणि जवळपासच्या भागात पुरवला जातो. पुणे बाजार समितीही बंदमध्ये सहभागी होणार आहे. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही बंदमध्ये सहभागी होणार आहे. .

बंद करून काय साध्य होणार? विविध शहरांतील व्यापाऱ्यांचा विरोध

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (shivsena, NCP, congress) या ३ पक्षांनी पुकारलेल्या या बंदला विविध शहरांतील व्यापाऱ्यांनी मात्र आक्रमकपणे विरोध दर्शवला आहे. जी घटना उत्तर प्रदेशात घडली त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, त्याचे समर्थन कुणालाही करता येणार नाही. मात्र त्यासाठी आपण आंदोलन करा… मोर्चे काढा, पण संपूर्ण महाराष्ट्र बंद करू नका, बंद करून काय साध्य होणार?’ असा प्रश्न व्यापारी असोसिएशनकडून विचारण्यात आला आहे.

मुंबईचे डब्बावाले बंदमध्ये सहभागी पण…..

मुंबईच्या डब्बावाल्यांनीही बंदला विरोध करण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी काळी पट्टी बांधतील पण बंदमध्ये सहभागी असणार नाहीत. राज ठाकरे यांची मनसेही बंदमध्ये सहभागी असणार नाहीय.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here