कराड : लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकासआघाडीने जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी कऱ्हाडमध्ये काँग्रेस (Congress),राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेनेच्यावतीने कराडच्या कोल्हापूर (Kolhapur) नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून दत्त चौकातुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे जोरदार घोषणाबाजी करत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले.
कऱ्हाडच्या कोल्हापुर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चास प्रारंभ झाला. कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कॉंग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष नगरसेवक आप्पा माने, कार्यकारणी सदस्य अशोकराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, झाकीर पठाण, शंकरराव खबाले, भागवत कणसे, नगरसेवक राजेंद्र यादव, प्रदीप जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, पोपटराव साळुंखे, महमंद आवटे, सतीश भोंगाळे, भाऊ पवार, संजय थोरात, सादीक इमानदार, संजय साळुंखे, शिवाजी पवार, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, नितीन काशीद, राजेंद्र माने, शशिकांत हापसे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई
हेही वाचा: Kolhapur : शिवाजी चौकापासून मुख्य दर्शन रांग
मोर्चा कोल्हापुर नाक्यावरुन दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर बोलताना अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, लखीमपुरची घटना ही काळीमा फासणारी आहे. या प्रवृत्तीच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटपक्ष यांनी महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. या घटनेच्या निषार्थ कऱ्हाडलाही महाविकास आघाडीने मोर्चा काढुन प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. या घटनेचा मी निषेध करतो. मोर्चाच्या पार्श्वभुमीवर कऱ्हाड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Esakal