मुंबई – सोशल मीडियामुळे जग जवळं आलं असं म्हटलं जातं. कित्येकांना त्यांच्या मनातील विचार, भावना व्यक्त करण्यासाठी मोठं व्यासपीठ मिळालं. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हि़डिओ, फोटो यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण माहिती आपल्यासमोर येते. यातील काही माहिती भलतीच मनोरंजक असल्याचे दिसुन आले आहे. ऑनलाईन असणं ही आता काळाची गरज झाली आहे. ऑनलाईन अॅक्टिव्ह राहिल्यानं काय फायदा होऊ शकतो याची एक रंजक गोष्ट समोर आली आहे. त्यात 78 वर्षांच्या व्यक्तीला 79 वर्षांची सहकारी मिळाली. ऑनलाईन चॅटिंगच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. त्यांचे एकमेकांवर प्रेम बसले. शेवटी हा प्रवास लग्नापर्यत येऊन थांबला.

सध्या सोशल मीडियावर या कपल्सची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. 78 वर्षीय जिम अॅडम्स आणि 79 वर्षीय अँड्रे कांउट्स अशी त्यांची नावं आहेत. कोरोनाच्या काळात ते ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आले. संवाद सुरु झाला. त्या संवादातून त्यांचं प्रेम फुललं. त्या प्रेमाला एका नात्याचा आधार द्यावा अशा उद्देशानं त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला. आता ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिड़िओला देखील मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाच्या काळात त्यांची ऑनलाईन एकमेकांशी ओळख झाली. आठ महिने हे ऑनलाईन चॅटींग सुरु होतं. त्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात लग्न केलं. कॅनडातील या जोडप्याचं सध्या कौतूक होतंय.

ओप्रा डेलीनं दिलेल्या एका वृत्तानुसार जिम अॅडम्स हे एक चित्रकार आणि निवृत्त प्राध्यापक आहे. 2017 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांच्या त्या लग्नाला 38 वर्ष झाले होते. कोरोनाच्या काळात त्यांनी एक डेटिंग अॅप डाऊनलोड केले होते. तो प्लॅटफॉ़र्म वय वर्ष 50 पेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी होता. त्यावेळी त्यांची ओळख 79 वर्षीय अँड्रेशी झाली. त्या एक रिटायर्ड इन्शुरन्स ब्रोकर आहेत. त्यांचा 33 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. जिम यांनी सांगितलं की, त्यांना त्या साईटच्या माध्यमातून अँड्रे यांना शोधून काढलं.

हेही वाचा: आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!

हेही वाचा: NCB : ड्रग्स विक्रेता ताब्यात; आर्यन खानशी संबंध?



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here