मॉस्को: प्रसिद्ध बोल्शोई थिएटर कलाकार येवगेनी कुलेशचे (Yevgeny Kulesh) रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) येथे रंगमंचावरील कार्यक्रमादरम्यान निधन झाले. त्याच्या मृत्यूपूर्वी 38 वर्षीय कुलेश स्टेजवर एक देखावा सादर करत होता. दरम्यान, स्टेजवर नाटकातील काही दृश्य बदलत असताना, येवगेनी कुलेश एका मोठ्या प्रोपखाली दबला गेला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. प्रेक्षकांना वाटलं, की कदाचित तो एक स्क्रिप्टचा भाग असेल. मात्र, दुर्दैवाने त्याचा खरंच मृत्यू झाला होता.
रशियन संगीतकार निकोलाई रिमस्की-कोर्साकोव यांच्या 19 व्या शतकातील ऑपेरा Sadko च्या सादरीकरणात सेट बदलाला जात असताना ही दुर्दैवी घटना घडलीय. सोशल मीडियावर शनिवारी घडलेल्या घटनेच्या काही क्लिप्स आता व्हायरल होत असून ज्यात स्टेजवर अचानक हालचाली वाढताना दिसताहेत. यामध्ये कुलेश हा प्रोपखाली दबला गेलाय. हे पाहून सहकारी कलाकार ओरडू लागले. या घटनेनंतर, स्टेजचा पडदा काढून टाकण्यात आला आणि प्रेक्षकांना हे प्रदर्शन रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
हेही वाचा: प्रियकरासोबत आईचं ‘सैराट’ पलायन; मुलीनं थाटला मुलाच्या बापाशीच ‘संसार’

मॉस्को
दरम्यान, ह्या घटनेनंतर लगेचच डॉक्टर जखमी येवगेनी कुलेशला पाहण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक ओरडताना दिसत आहेत. मॉस्कोच्या तपास समितीने एका निवेदनात म्हटलंय, की समिती अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी करत आहे. तर, बोल्शोई थिएटरच्या माजी अभिनेत्यांनी जगप्रसिद्ध ठिकाणी काम करण्याच्या परिस्थितीचा निषेध नोंदवलाय. त्यांनी सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपस्थित केला असून संबंधितांवर टीका केलीय.
Esakal