लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच पूर्ण महाराष्ट्रात बंदचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.
रामटेकडी परिसरात व्यवसायिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसला. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर काही दुकान दारांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली आहेत. रामटेकडीमध्ये काही वेळा करीता रस्ता रोको करण्यात आला.नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीतर्फे भारत बंद पुकारला, त्या निमित्त सोमवारी काढण्यात आलेली बंद आवाहन रॅली, दुकाने बंद करताना दुकानदार, मेन रोड येथे रॅल्ली येताच दुकाने बंद झाली आहे.खडकी उपगरात महाराष्ट्र बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून खडकीतील मुख्य बाजारपेठेतील अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. हिंगोली : हिंगोलीत सोमवारी (ता. ११) कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती भगतसिंह कोश्यारी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.सातारा : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकासआघाडीने जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सातारा, कऱ्हाडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून दत्त चौकातुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चौका चौकात जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते.सर्व व्यवहार सुरळीत आणि शांतपणे सुरू आहे. 50 टक्के दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहे50 टक्के दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहे तर काही जणांनी नेहमीप्रमाणे आपल्या वेळेनुसार दुकाने उघडली.कऱ्हाड : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासून या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.माण तालुक्यात लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. दहिवडी येथे महाविकास आघाडीने मोर्चा काढून भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.कोल्हापुरात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.त्यामुळे खडकी सराफ बाजार, किराणा बाजार, कापड बाजार यासह फळ, भाजी मंडई बंद असल्याने बाजारात आज शुकशुकाट होता. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध करत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देत शहरातील व्यवहार बंद करण्यात आले.सोमवारी काढण्यात आलेली बंद आवाहन रॅली, दुकाने बंद करताना दुकानदार, मेन रोड येथे रॅल्ली येताच दुकाने बंद झाली आहे.बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.मुंबईत महाविकास आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी या बंद ची हाक दिली आहे. रामटेकडी परिसरात व्यवसायिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिकताना दिसला. महाविकास आघाडी तील कार्यकर्त्यांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर काही दुकान दारांनी स्वतः हुन दुकाने बंद ठेवली आहेत. रामटेकडी मध्ये काही वेळा करीता रस्ता रोको करण्यात आला.इचलकरंजी : जय जवान, जय किसान अशा जोरदार घोषणा देत उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शहरात आक्रमक पवित्रा घेतला. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध करत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देत शहरातील व्यवहार बंद करण्यात आले.तसेच चौका चौकात जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते. त्यामुळे खडकी सराफ बाजार, किराणा बाजार, कापड बाजार यासह फळ, भाजी मंडई बंद असल्याने बाजारात आज शुकशुकाट होता. प्रचंड पोलीस बंदोबस्तात गांधी पुतळा ते प्रांत छत्रपती शिवाजी पुतळा चौक या मुख्य मार्गावरून जागोजागी निदर्शने करत मोर्चा निघाला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.वाईत 100 टक्के बंद, सोमवार आठवडा बाजार असूनही बंदमुळे भाजी मंडईत शुकशुकाट होता.