नागपूर : आहार कसा आणि कधी घ्यावा याबद्दल बरीच मतभिन्नता आढळते. काही जण दोन वेळा तर काही जण दिवसातून चार वेळा थोडं थोडं खाण्याचा आग्रह धरतात. या धर्तीवर बघायचे तर मधल्या वेळचे खाणे उपयुक्त ठरू शकते हे अनेक तज्ज्ञांचे मत गृहीत धरायला हवे. अर्थातच यासाठी आरोग्यदायी पर्याय अवलंबायला हवे.

कमी कॅलरीयुक्त पण पोषक घटक असणारा आहार घ्या. दाणे, बदाम, मकाणे, खाकरा, दही, पिनट बटरवाले सँडविच असे काही पर्याय आहेत.
मधल्या वेळचे खाणे म्हणजे जेवण नाही हे लक्षात घ्या. लो कॅलरीयुक्त पदार्थांची निवड केली तरी पोटभर खाऊ नका. हे खाण मर्यादितच असू द्या.
न्याहारी आणि दुपारच्या जेवणाआधी तसेच दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणादरम्यान काही तरी खा. दिवसातून दोनदाच असे करा. सतत काही तरी खात राहू नका.
जास्त वेळ उपाशी राहिल्याने मधल्या वेळी जास्त खाण होते. त्यामुळे दोन जेवणांमध्ये उपाशी राहू नका
मधल्या वेळात खाल्ल्याने तुमची शक्ती टिकून राहील तसेच जेवणही कमी जाईल

Esakal

108 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here