अनेकांना शरीरावर टॅटू (tattoo) काढायला आवडतो. अनेकजण टॅटूसाठी सुईमुळे होणारा त्रास देखील सहन करतात. मात्र, संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदविल्यानंतर इंजेक्शनची भीती वाटते, असं कोणी म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण, एका महिलेसोबत असंच घडलंय. तिच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहे. पण, इंजेक्शन घेतल्यानंतर तिला चक्कर येतेय.
हेही वाचा: शारीरिक संबंधांमुळे फक्त दुःख मिळते, मॉडलने सांगितला अनुभव
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, जाना मेलोडी मिलर असे या महिलेचे नाव असून ती जर्मन येथील रहिवासी आहे. तिला टॅटूची प्रचंड आवड आहे. व्यवसायाने ती मेकअप आर्टीस्ट असून टॅटू गोंदवताना होणारा त्रास तिला सहन होतो. मात्र, इंजेक्शनची सुई टोचताच तिला चक्कर येतेय आणि शुद्ध हरवते. मिलर या भीतीबाबत डॉक्टरांना सांगते त्यावेळी रुग्णालयातील सर्वचजण तिच्यावर हसतात, असंही ती सांगते. मिलरला किशोरवयापासूनच टॅटू काढायची सवय आहे. तिने वयाच्या १९ व्या वर्षी पहिला टॅटू गोंदवला. तेव्हापासून तिने शेकडो टॅटू आपल्या शरीरावर गोंदवले आहेत. पण, डॉक्टर आणि नर्सेसच्या हातात इंजेक्शन दिसताच तिला भीती वाटते. इंजेक्शन घेताना तिला चक्कर येते.

जा मेलोडी मिलर
मिलरला टॅटू गोंदवताना भीती वाटत नाही. तिने टॅटूसाठी जितका खर्च केला आहे. त्यामध्ये तिला एखादी कार विकत घेता आली असती. टॅटू बनविताना तिला भाती वाटत नाही, मात्र इंजेक्शन घेताना तिला चक्कर का येतात? याबाबत देखील तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवरून खुलासा केला आहे. टॅटू गोंदवताना अॅनेस्थेशिया दिला जातो, तर इंजेक्शन देताना अॅनेस्थेशिया दिला जात नाही. टॅटू गोंदवताना त्रास झाला, तरी ते सुंदर दिसतात. त्यामुळे मी हा त्रास सहन करू शकते, असंही ती सांगितले.
Esakal