जळगाव ः उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथील शेतकरी (Farmer) हत्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकार विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे विविध ठिकाणी महाराष्ट्र बंद आंदोलन (Maharashtra Bandh Andolan) करण्यात आले. त्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे दुपारी महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) सुरू आज दुपारी बंद आंदोलन केले जात असतांना भाजप कार्यकर्ते आणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरा-समोर येवून शाब्दीक वाद झाला. त्यानंतर धक्काबुक्की व हाणामारीची (Fighting) घटना घडली. या घटनेमूळे एकच धावपळ उडाली. या घटनेत माजी नगराध्यक्षसह त्यांचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: जामनेर; ‘पब्जी’चा बळी..खेळाच्या नादात तरुणीची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यात आज महाराष्ट्र बंद ला चांगला प्रतिसाद मिळत असून वरणगाव येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र बंद आंदोलन केले जात होते. त्याच वेळी भाजपचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी समोरा समोर आल्याने शाब्दीक वाद झाला. वाद वाढत गेल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात काही जण जखमी झाल्याचे माहिती समोर येत आहे. हा वाद आगामी वरणगाव नगरपालिकेची होणारी निवडणूकी पूर्वीच घडला आहे.

आणि समोरा समोर आले..

वरणगाव येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते गावातील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आव्हान करत असतांना तेथे भाजपचे माजी नगराध्यक्ष हे कार्यकर्त्यांसह येवून व्यापाऱ्यांना बंद न करण्याचे सुचना करत होते. त्यामुळे महाविकास आघाडी व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक वाद झाला त्यानंतर धक्काबुक्की होवून मारहाणीची घटना झाल्याची माहिती समोर येत आहे. या काही जण जखमी झाले झाल्याची माहीत समोर येत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here