कोल्हापूर : जे जे देश प्रगत झाले तेथे शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून दिली गेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र अजूनही तसेच आहेत. याबाबत कोणतेही राजकारण न करता शासनाला शेतकऱ्यांना मदतीची सुबुद्धी दे, असे साकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांनी दिली. आज दुपारी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, ‘‘निवडणुका आल्या की राज्यकर्त्यांना शेतीप्रधान देश आणि शेतकऱ्यांची आठवण येते. बेंबीच्या देठापासून त्यांना न्याय हक्क देण्याची भाषा बोलली जाते आणि नंतर मात्र शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना विसर पडतो. दोषी असणारा कुणीही असो. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. बंद करून कधीच सुटत नाहीत. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गट-तट विसरून प्रयत्न झाले पाहिजेत.’’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील प्राप्तिकरच्या कारवाईबाबत बोलताना त्यांनी जे पेरले तेच उगवले, अशी टीका केली. जनतेचा पैसा जनतेकडेच गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी चुकीच्या हातात मराठा आरक्षणाची मशाल असल्याचे सांगून जातनिहाय जनगणना करून तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here