sakal_logo

द्वारे

शब्दांकन : अरुण सुर्वे, सुवर्णा काळे, अभिनेत्री

– मोहक अन्न

मला प्रथम माझ्या बाबांबद्दल सांगायला आवडेल. माझ्या आईच्या आजारपणामुळे आणि माझ्या कामामुळे सध्या रोजचा स्वयंपाक माझे बाबाच करत आहेत. ते कंपनीमध्ये कामाला होते, तेव्हा मशिनमध्ये त्यांची बोटं अडकली आणि त्यांच्या बोटांचं ऑपरेशन झालेलं आहे. तरीही ते रोज आमच्यासाठी स्वयंपाक करतात. अशी मोठी जबाबदारी माझ्या बाबांनी स्वीकारली आहे.

मी अभिनेत्री नसते, तर मी नक्कीच हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात गेले असते. कारण, वेगवेगळे पदार्थ शिकण्यासाठी दहावीला असतानासुद्धा मी कुकिंगचा क्लास लावला होता. अभिनयात असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मी फिरले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांतल्या वेगवेगळ्या गावातल्या छान-छान पदार्थांची चव चाखायला मिळते. परंतु, माझ्या आवडीचं काही असेल तर ते म्हणजे माझ्या वडिलांच्या हाताचं काहीही. ते इतका अप्रतिम स्वयंपाक करतात. आम्हाला आता आईच्या हातच्या जेवणापेक्षा वडिलांच्या हातचं जेवण जास्त आवडतं. त्यांनी सेवानिवृत्ती घेतली, तेव्हा ते घरी चहा वगैरे करायचे; पण नंतर त्यांना त्यात रस येत गेला आणि आईच्या आजारपणामुळे त्यांनी स्वयंपाक करण्याची जबाबदारी स्वीकारली. बाबा चहा खूप छान करतात. त्यात ते पुदिना, विलायची पूड, अद्रक, तुळशीचं पान टाकतात आणि छान ब्लॅक टी बनवतात, जो आम्ही रोज पितो.

कोल्हापूर मिसळसाठी प्रसिद्ध आहे; पण मला आवर्जून सांगायला आवडेल, की तिथली पुरणपोळी खूप अप्रतिम असते. कोल्हापूरच्या मंदिराजवळ एक मेस आहे, तिथली पुरणपोळी मी नेहमीच खाते. मला स्वयंपाक खूप आवडतो. त्यामुळे सगळेच प्रकार मी बनवून पहिले आहेत. मला असं वाटतं, की आपण सगळेच पदार्थ घरी बनवले तर ते जास्त हेल्दी असतात. लॉकडाउनच्या काळात मी बरेच पदार्थ बनवून पहिले आणि कोणताही पदार्थ माझ्याकडून बिघडला नाही. मला सगळ्याच भाज्या आवडतात. माझ्यासाठी माझे वडीलच सुगरण आहेत. कारण, त्यांची स्वयंपाक करण्याची पद्धतच फार वेगळी आहे, अगदी भाज्या कशा चिरायच्या हेदेखील त्यांच्या कडूनच शिकले पाहिजे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here